Ashok Chavan Resignation : सर्व्हेतील काँग्रेसच्या यशामुळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; सतेज पाटलांचा भाजपवर रोख

Satej Patil on Ashok Chavan : कोल्हापुरातील काँग्रेसचा गड मजबूत, नव्या दमाने पुढे नेणार
Satej Patil, Ashok Chavan
Satej Patil, Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News :

माजी मुख्यमंत्री आणि आमदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसमध्ये तर प्रचंड खळबळ उडाली आहे. चव्हाणाच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देण्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी काँग्रेसला नव्या दमाने पुढे नेणार आणि पुन्हा काँग्रेसला मजबूत करणार, असे स्पष्ट करून पक्षात नवी जान आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Satej Patil, Ashok Chavan
Ashok Chavan : अशोकरावांचा राजीनामा अन् पृथ्वीराजबाबांनी बोलून दाखवली मनातली 'ही' खंत

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी काँग्रेस सोडण्याची भूमिका का घेतली, हे माहीत नाही, असे सतेज पाटील म्हणाले. त्याचवेळी आता आम्ही तरुण काँग्रेसच्या (Congress) विचाराचा झेंडा पुढे घेऊन जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी सकाळपासून 20 ते 22 आमदारांशी बोललो आहे. यातून एक बाब स्पष्ट झाली, काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जातील यात काही तथ्य नाही. राज्यात काँग्रेससाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन लढू, असे आमदारांचे म्हणणे असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा सर्व्हे आला. आम्ही एकत्र राहिल्यानंतर महाविकास आघाडीला (MVA) मोठे यश मिळेल. महाराष्ट्रातील जनतेचा मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. महायुतीचा कारभार लोकांना आवडलेला नाही. हे सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे कुठंतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते काँग्रेसचा झेंडा समर्थपणे पुढे घेऊन जाणार आहोत. या सगळ्या घटना घडल्यानंतर कोणत्याच निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे मतदार निवडणुकीत आम्हाला कौल देतील. आता काँग्रेस म्हणून आम्ही एकसंध राहणार, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्याचे महाराष्ट्रातील राजकारणावर दीर्घकाळ परिणाम होतील, अशी राजकीय चर्चा आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Satej Patil, Ashok Chavan
Ravindra Dhangekar On Chavan Resign: चव्हाणांच्या विश्वासावर काँग्रेसमध्ये आलेल्या धंगेकरांचं काय ठरलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com