Balasaheb Thackeray : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार हे समजताच शिवसैनिकांमध्ये एक संचार आणि शक्ती दिसायची. शहर अगदी भगवेमय व्हायचे. आजही बाळासाहेबांचे नाव काढले तर सच्चा शिवसैनिकांच्या अंगावर काटा आणि डोळ्यांतून अश्रू येतात. शिवसैनिकांनी पुकारलेले आंदोलन तडीला नेलेला लढा आजही डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. गल्लोगल्ली शिवसेना आणि वाघाचे चिन्ह असलेल्या शिवसेनेच्या शाखांचे फलक ही शिवसेनेची ताकद गल्लीबोळापासून दिसत होती. आंदोलनाची धार काय असते हे शिवसेनेने नेहमी दाखवून दिले. Maharashtra Latest News Politics
हिंदुहृदय सम्राट यांचा कोल्हापूर (Kolhapur) दौरा असो वा सभा हातातले कामं सोडून, दुकाने बंद करून आणि बांधावरची वैरण टाकून शिवसेनेचा कार्यकर्ता बिंदू चौकातल्या भाषणाला गर्दी करायचे. मात्र, सध्या कोल्हापूरमधील शिवसैनिकांची परिस्थिती वेगळी आहे. राज्यात शिवसेनेत फूट पडली. हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांना तिलांजली देत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत घरोबा केल्याची टीका करत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) साथ सोडली. त्यामुळे आमदार-खासदार, पदाधिकारी शिवसैनिक आता दुभंगले आहेत.
आता दोन्ही गटांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचा Balasaheb Thackeray विचार आणि वारसा सांगितला असला तरी त्यांचा विचार जोपासण्याचे कामं कोण करतंय? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. शिवसेनेत पडलेल्या गटाला कोणी ‘गद्दार’ म्हणाले तर कोणी ‘बंड’ म्हणाले. पण वास्तविकता शिवसेनेची Shivsena जिल्ह्यातील ताकद तुलनेने कमी झाली आहे हे सत्य आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेने आतापर्यंत शहरात आमदार दिले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाणाचे वर्चस्व दाखवून दिले. त्याच बाळासाहेबांनी जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार पाहिजे हे स्वप्न बाळगले होते. उशिर झाला पण बाळासाहेबांच्या निधनानंतर का होईना, जिल्ह्याला शिवसेनेचे धनुष्यबाणावर विजयी झालेले दोन खासदार मिळाले. जिल्ह्यात दहापैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. ही शिवसेनेची वाढलेली ताकद होती. मात्र, मुंबईत शिवसेना दुभंगली. एकनाथ शिंदे यांनी सवतासुभा मांडत थेट भाजपशी नाळ जुळवली आणि ते मुख्यमंत्री झाले.
खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik), खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane), आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर ठाकरे यांच्याकडे संजय पवार, विजय देवणे यांच्यासारखे निष्ठावंत शिलेदार राहिलेत.
'शिवसेना’ हे पक्षाचे नाव, ‘धनुष्यबाण’ चिन्ह गमावले. तरीही आता हातात ‘मशाल’ घेऊन ती पेटविण्याचा, त्याची धग जिल्ह्यातील वाड्यावस्तीपर्यंत पुन्हा पोचविण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या दोन्ही जागेवर दावा असला तरी काँग्रेसने ती जागा मिळवली. ठाकरे गटाकडे (Uddhav Thackeray) उमेदवार नसल्याने साहजिकच ही जागा सोडावी लागली. शिवाय काँग्रेसचे अधिक आमदार असल्याने कोल्हापूरच्या जागेवर हक्क मिळवला. एकीकडे ठाकरे गट अस्तित्वात नसताना काँग्रेसच्या (congress) बळावरचं जिल्ह्यातील विद्यमान खासदारांना धडा शिकवावा लागणार आहे, तर ठाकरे गटाचे दोन पदाधिकारीचं काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात राहून मातोश्रीवरील प्रत्येक हालचाली पोहाेचविण्याचे प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. आज ना उद्या त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे सांगतिले जाते. एकेकाळी सहा आमदार असलेल्या जिल्ह्यात केवळ एक आमदार मिळाला, तर लोकसभेचे दोन खासदार मिळवलेल्या ठाकरे गटाकडे कोल्हापूर (Kolhapur) व हातकणंगले मतदारसंघात उमेदवार मिळत नाही. हे शिवसेना ठाकरे गट अस्तित्वात आहे की नाही. हे संकेत आहेत.
तर त्याउलट मुख्यमंत्री शिंदे यांनी खुद्द कोल्हापुरातील शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊन येथील नेत्यांना, कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. महिन्यातून दोन दौरे केवळ कोल्हापूर जिल्ह्यात झाले. सहा आमदारांची आणि दोन खासदारांची ताकद त्यांना पुन्हा उभा करायची आहे. ज्या भाजपसोबत त्यांनी घरोबा केला, त्यांच्या शिस्तीचे पालन ही त्यांना आता करावे लागत आहे. विद्यमान खासदारांनासुद्धा लोकसभेची उमेदवारी मिळविताना होणारी दमछाक होत आहे. शिवाय त्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांना वारंवार दिल्लीची मनधरनी करावी लागत आहे. जर मुख्यमंत्री शिंदे यात यशस्वी झाले तर शिवसैनिकांमध्ये एक हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा सकारात्मक विचार जाण्याचा संदेश आहे. कार्यकर्ते दुभंगले आहेत. पण उमेदवाराच्या विजयाबाबत ठोस संभ्रमावस्था असल्याची चर्चा वाढली. उमेदवारी घोषित करण्यासाठी होणारा वेळ हे त्याला खतपाणी घालत आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.