Lok Sabha Election 2024 Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election Analysis: 258 जागांवर मतदानांची टक्केवारी घसरली! आकडेवारी काय सांगते? महाराष्ट्र अन् गुजरात...

Central Election Commission: राजस्थान, तामिळनाडू येथील परिस्थिती वेगळी नाही, येथील 90 टक्के जागांवर कमी मतदान झाले आहे. उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश १० टक्के कमी मतदान झाले आहे.

Mangesh Mahale

लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांचे मतदान (Lok Sabha elections 5 phases) झाले आहे. आत्तापर्यंत झालेल्या मतदानावर भाजप आणि इंडिया आघाडीचे नेते राज्यातील मतदारसंघातील मतदानाची आकडेमोड करीत आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकामधील मतदानाची तुलना करीत आम्हीच विजयाचा गुलाल उधळणार, असा दावा सत्ताधारी आणि इंडिया आघाडीने केला आहे.

देशभरात ज्या 409 जागांचे विश्लेषण केले आहे, त्यात सहा जागांवर 2019च्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. यात पुणे आणि मुंबई दक्षिण लोकसभेचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये मतदान चांगले झाले आहे. प्रत्येक जागेवर मतदान आणि पूर्ण मतमोजणी दोन्ही जास्त झाली आहे. प्रत्येक जागेवर नेमके किती मतदान झाले, याची आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली नसली तरी मतदारांचा पत्ता आणि मतदानाची टक्केवारीही देण्यात आली आहे.

2019च्या तुलनेत या निवडणुकीत 409 पैकी 258 जागांवर मतदारांनी टक्केवारी घटली आहे. 88 जागा म्हणजे पाच जागापैकी प्रत्येकी एका जागेवर गे्ल्या वर्षातील मतदानांच्या तुलनेत टक्केवारी घसरवल्याचे दिसते.

केवळ एक किंवा दोन राज्यात मतदानांची टक्केवारी घटली नसून जवळपास सर्वच राज्यामध्ये मतदान कमी झाले आहे. केरळच्या सर्वच वीस जागांवर टक्केवारी घटली आहे. 12 जागांवर 2019च्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. उत्तराखंड येथेही या निवडणुकीत पाच जागांवर कमी मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थान, तामिळनाडू येथील परिस्थिती वेगळी नाही, येथील 90 टक्के जागांवर कमी मतदान झाले आहे. उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश १० टक्के कमी मतदान झाले आहे. गुजरातमध्ये 25 टक्के जागांवर 2019च्या तुलनेत मतदान घटले आहे.

मतदानाच्या कमी टक्केवारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानासाठी जनजागृती केली होती. तरीही गेल्या (2019) निवडणुकीच्या तुलनेत पाचही टप्य्यातील मतदारसंघात बहुसंख्य मतदारांनी पाठ फिरवल्याने एकूण टक्केवारी घटली आहे. एका इंग्रजी दैनिकाने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT