Rakesh Tikait News: भाजपला पराभूत करण्यासाठी टिकैत यांची रणनीती; शेतकऱ्यांना केलं आवाहन

Lok Sabha Election2024: किसान मोर्चो हा अराजकीय आहे, निवडणुकीपासून दूर आहे, पण शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Rakesh Tikait
Rakesh TikaitSarkarnama

Lok Sabha Election2024, 24 May: "भाजपच्या उमेदवाराला पराभूत करु शकणाऱ्या उमेदवाराला मतदान करा," असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मतदारांना केले आहे. जनता ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे टिकैत यांनी सोशल मीडिया म्हटलं आहे.

भाजप BJP नव्हे तर भांडवलदारांचा एक गट ही लोकसभा निवडणूक लढवत आहे, असा संताप राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. "देशातील मतदानचे दोन टप्पे बाकी आहे. हे भाजपचे सरकार नसून भांडवलदारांचे सरकार आहे. या टोळीने देश व्यापला आहे. या निवडणुकीत मतदार भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना धडा शिकवणार आहे," असे टिकैत म्हणाले.

Rakesh Tikait
Mehbooba Mufti New: अनंतनाग-राजौरीत तिरंगी लढत; मेहबूबा मुफ्तींची राजकीय परीक्षा...

भाजपचे काही नेते मतदारांना फोन करून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्ली, पंजाब. उत्तर प्रदेश किसान मोर्चोने भाजपला पराभूत करणाऱ्या उमेदवाराला पाडण्याची सूचना दिल्या आहेत. किसान मोर्चो हा अराजकीय आहे, निवडणुकीपासून दूर आहे, पण शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'नोटा'चे बदन दाबू नका, त्यामुळे सरकारला फायदा होतो. निराश होऊ नका, आपल्या उमेदवाराला मतदान करा, संघर्षासाठी तयार रहा, असे टीकैत म्हणाले.

किसान मजदूर मोर्चा (KMM) च्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या निषेधाचा भाग नाही, ज्यात पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) आणि शेतकरी कर्जमाफीची कायदेशीर हमी समाविष्ट आहे, असे ते म्हणाले.

Rakesh Tikait
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात घटलेल्या जागा भाजप 'या' राज्यांमधून मिळवणार? असा आहे 'मेगा प्लॅन'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com