Maharashtra BJP Candidate list : भाजप ने लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील चित्र स्पष्ट केले. हे करताना भाजप ने वीस जागांची पहिली यादी जाहिर करत जुने चेहरे कायम ठेवले तर तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर येथून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, तर चंद्रपूर येथून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकिट देत हंसराज अहीर यांना भाजप ने झटका दिला आहे. तर वर्धा मध्ये रामदास तडस यांच्यावर भाजपने विश्वास कायम ठेवत रामदास आंबटकर यांच्यासह इतरांना संधी नाकारली. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे तिकिट पहिल्या यादीत घोषित केले नाही याचा विरोधकांनी शंख केला होता. पण, भाजप ने नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेता आहे, हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील यादी घोषित करताना दाखवून दिले. संघ मुख्यालय असलेल्या नागपूरातून भाजप ने नितीन गडकरी यांच्यावरचा विश्वास आज वृध्दींगत केला आहे. या विषयीचा जल्लोष भाजप च्या नागपूरकर कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.
बीड, पुणे, अकोला, नंदूरबार या ठिकाणी तरुणांवर भाजप ने विश्वास दाखवित त्यांना संधी दिली आहे. हे करताना भाजप ने जातीय समीकरण देखील लक्षात घेत जागा घोषित केल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती मध्ये भाजप च्या वाट्याला किती जागा या वर एकमत झाले नव्हते. असे असताना आज भाजप ने महाराष्ट्रातील वीस जागांची घोषणा करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेशर टाकले आहे. थेट पुण्याची जागा मुरलीधर मोहोळ यांना घोषित करत पुणे राष्ट्रवादीला सोडण्याची शक्यता धुळीस मिळवली. तर रावेर या ठिकाणी रक्षा खडसे यांना पुन्हा तिकिट देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांना कोडींत पकडले आहे. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा आहेत. अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना तिकिट दिले आहे. त्याचा थेट संघर्ष वंचित चे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राहणार आहे. अनुप धोत्रे हे राजकीय दृष्ट्या नवखे असताना थेट प्रकाश आंबेडकर यांच्या सारख्या मुरब्बी राजकारण्यासमोर भाजपने नवख्या उमेदवाराला संधी कशी दिली असा प्रश्न भाजप ज्येष्ठांना पडला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीत भाजपाने मारली बाजी मारत आज 20 जागांची घोषणा केली. नंदूरबार (एसटी) - हिना विजयकुमार गावित, धुळे - डाॅ.सुभाष रामराव भामरे, जळगाव - स्मिता वाघ, रावेर - रक्षा निखिल खडसे, अकोला - अनुप संजय धोत्रे, वर्धा - रामदास तडस, नागपूर - नितीन जयराम गडकरी, चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार, नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी (एसटी)- डाॅ.भारती प्रवीण पवार, भिवंडी-कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई उत्तर - पियूष गोयल, मुंबई उत्तर पुर्व - मिहिर कोटेचा, पुणे - मुरलीधर मोहोळ, अहमदनगर - डाॅ.सुजय विखे, बीड - पंकजा मुंडे, लातूर (एससी) सुधाकार श्रृंगारे, माढा - रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी आज भाजप ने घोषित केली.
महायुतीत भाजपने आज सर्वप्रथम लोकसभेच्या वीस जागांचे उमेदवार घोषित केल्या. महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटप आणि एकूण किती जागा मित्र पक्षांना सोडणार यावर एकवाक्यता भाजप ची झाली नव्हती. अशा वेळी भाजप ने आज परंपरागत लोकसभा जागांचे उमेदवार निश्चित केले. असे करताना भाजप ने मित्र पक्षांना विचारत घेतले की नाही असा प्रश्न कायम आहे. तर दूसरीकडे अद्याप महाविकास आघाडी उमेदवार घोषित करण्यात मागे पडल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीची वंचित सोबत आघाडी होते की नाही, जागा वाटप, उमदेवार निश्चिती झाली नसल्याने उमेदवारांच्या नावाची घोषणा होताना दिसत नाही.
राज्यात 48 लोकसभा मतदार संघापैकी चार ठिकाणी भाजपने उमेदवारांना डच्चू दिल्याचे चित्र आहे. तिथे नवीन उमेदवार देत भाजपने बदल केला आहे. बीड मध्ये मुंडे भगिंनींमध्ये बदल केला डाॅ. प्रितम मुंडे यांना वगळून भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना तिकिट देण्यात आले आहे. जळगाव येथे उन्मेष पाटील यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना तिकिट देण्यात आले. मुंबई उत्तर येथून गोपाळ शेट्टी यांचे तिकिट कापण्यात आले त्यांच्या जागेवर केंद्रिय मंत्री पियूष गोयल यांना तिकिट देण्यात आले.
कोण आहेत स्मिता वाघ ?
जळगाव च्या माजी विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ या 2019 मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघात दावेदार होत्या. पण, भाजपच्या सर्वेक्षणात त्यांच्या नावावर 2019 मध्ये फुली मारण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून कार्य करणाऱ्या स्मिता वाघ यांचा राजकीय संघर्ष देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्यांनी विविध पदे भुषविले आहेत. जळगाव दूध संघात त्यांचे महत्व लक्षात घेता आणि नाथाभाऊंना शह देण्यासाठी थेट स्मिता वाघ यांना उमेदवारी देत भाजपने तिथे उन्मेष पाटील यांचे तिकिट कापले आहे. स्मिता वाघ यांचे गेल्यावेळी तिकिट कापले तेव्हा त्यांनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार घेतल्याचे घोषित केले होते. यंदा त्यांना तिकिट देत भाजपने गेल्यावेळी दिलेले वचन पुर्ण केले आहे. महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील स्मिता वाघ यांनी पक्षाची महत्वपुर्ण जबाबदारी सांभाळली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.