BJP Lok Sabha Candidate Second List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आता उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 20 खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, दिंदोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील यांना पक्षाचे तिकीट देण्यात आले आहे. तर चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कट करुन स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई उत्तर पूर्वमधून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करुन मिहिर कोटेचा यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई उत्तर लोकसभा मतदारंसघातून गोपाळ शेट्टी यांना डावलत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उमेदवारी दिली आहे. तर बीड या लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या चार विद्यमान खासदारांचा भाजपने पत्ता कट केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने अकोल्यातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. संजय धोत्रे यांची उमेदवारी अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
1. नंदुरबार - डॉ. हिना गावित
2. धुळे- सुभाष भामरे,
3. जळगाव- स्मिता वाघ
4. रावेत- रक्षा खडसे
5. अकोला-अनूप धोत्रे,
6. वर्धा- रामदास तडस
7. नागपूर- नितीन गडकरी
8. चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
9. नांदेड- प्रतापराव चिखलिकर
10. जालना- रावसाहेब दानवे
11. डिंडोरी- भारती पवार
12. भिवंडी- कपिल मोरेश्वर पाटील
13. मुंबई उत्तर- पियूष गोयल
14. मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
15. पुणे- मुरलीधर मोहोळ,
16. बीड- पंकजा मुंडे
17. अहमदनगर- सुजख विखे पाटील
18. लातूर- सुधाकर श्रृंगारे
19. माढा- रणजीत सिंह निंबाळकर
20. सांगली- संजयकाका पाटील
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.