Murlidhar Mohol News: भाजपाचं पुण्यात धक्कातंत्र! मुळीक, देवधरांचा पत्ता कट, मोहोळांच्या गळ्यात उमेदवारीची माळ

Lok Sabha Election 2024 : मागील दोन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पुण्यामधून भाजपला प्रचंड मोठ यश मिळाल्याचे पाहायला मिळालं. यंदा देखील ही विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजपाकडून सर्वसमावेशक नेत्याला लोकसभेचे तिकीट देणार असल्याचं बोललं जात होतं.
sunil deodhar jagdish mulik murlidhar mohol
sunil deodhar jagdish mulik murlidhar moholsarkarnama

Pune News : भाजपाकडून पुणे लोकसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत मोठ्या प्रमाणात खल काही दिवसांपासून सुरू होते. याबाबत सर्व्हेदेखील भाजपाकडून करण्यात आले होते. भाजपाकडून प्रामुख्याने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतच माजी आमदार जगदीश मुळीक , नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये भाजपाचं मोठं काम करणारे सुनील देवधर हे प्रमुख लोकसभेचे इच्छुक रिंगणात होते. मात्र, अखेर भाजपाच्या वरिष्ठांकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावरती विश्वास दाखवत त्यांना आगामी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

मागील दोन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पुण्यामधून भाजपला प्रचंड मोठ यश मिळाल्याचे पाहायला मिळालं. यंदा देखील ही विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजपाकडून सर्वसमावेशक नेत्याला लोकसभेचे तिकीट देणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार भाजपाच्या वरिष्ठांकडून अनेक सर्वे देखील करण्यात आले तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मत देखील जाणून घेण्यात आलं. यानंतर अखेर मोहोळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

sunil deodhar jagdish mulik murlidhar mohol
Rahul Gandhi News : चांदवडच्या शेतकऱ्याचे राहुल गांधींना पत्र; कांदा निर्यात बंदीच्या आडून भ्रष्टाचार?

मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतर कोथरूडमधून लोकसभेसाठी खासदारकीचे तिकीट मुरलीधर मोहोळ यांना मिळणार का याबाबत साक्षरता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अखेर या सर्व चर्चांना बाजूला ठेवत पक्ष नेतृत्वाने मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात उमेदवारीचा हार घातला आहे.

मोहोळ हे दोनदा नगरसेवक महापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले आहेत. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाते. आणि ही जवळ एकच त्यांना तिकीटापर्यंत घेऊन गेली असल्याचं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचा उमेदवार ठरल्याने आता काँग्रेसमधून त्यांच्यासमोर कोणता उमेदवार असणार या चर्चांना देखील रंग आला आहे. भाजपाकडून मराठा उमेदवाराला रिंगणात उतरवण्यात आल्याने काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी आमदार मोहन जोशी आणि कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे काँग्रेसचे उमेदवारीचे प्रमुख दावेदार असल्याचं मानले जात आहे.

sunil deodhar jagdish mulik murlidhar mohol
Murlidhar Mohol News : "जलने वालो को खबर कर दो, अब...", मोहोळांनी कोणाला दिला 'हा' इशारा?

कोण आहेत मोहोळ ?

संघटनेतील भूमिका आणि जबाबदाऱ्या

• महापौर, पुणे

• भाजपा वॉर्ड सरचिटणीस

• भाजपा वॉर्ड अध्यक्ष

• अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, विधानसभा मतदारसंघ

• अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर

• चिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र

• उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र

• सरचिटणीस, भाजपा, पुणे शहर

• संघटन सरचिटणीस, भाजपा, पुणे शहर

आत्तापर्यंत कोणती पदभूषवली

• सभासद, पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ

• पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून सलग तीन वेळा विजयी

• पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष - २०१७-१८

• संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) - २०१७-१८

• संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) २०१७-१८

• सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) २०१७-२०१८

खडकवासला विधानसभा (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार- २००९

sunil deodhar jagdish mulik murlidhar mohol
BJP Lok Sabha Candidate List : भाजपने महाराष्ट्रातील 'या' 4 खासदारांचा पत्ता केला कट; पाहा यादी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com