Raj Thackeray Gudhi Padwa Speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्रात मनसे सैनिकांना लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मोदींची गुढी उभारण्याचा आदेश दिला. इतक्यावर ते थांबले नाही तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना महाराष्ट्र विधानसभेची जय्यत तयारी करण्याचे सांगितले. राज्यसभा आणि विधान परिषद नको, असे स्पष्टपणे सांगत राज ठाकरे यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासुन समान अंतर कायम ठेवले. केवळ तरुणांच्या हितासाठी मोदींना पाठिंबा देण्याचे सुतोवाच राज ठाकरे यांनी आज केले. लोकसभा निवडणुकीनंतर अपेक्षित काम मोदी यांनी केले नाही तर 'लाव रे तो व्हिडीओ' चा दुसरा अंक सुरु करु असे ही सांगुन टाकले. (Lok Sabha Election 2024)
महाराष्ट्रात राजकीय व्यभिचाराला मतदारांनी राजमान्यता देऊ नये. देशासाठी पुढील काही दिवस महत्वाचे असुन पुढील पाच वर्षासाठी मोदींना मनसे सैनिकांनी पाठबळ देण्याची घोषणा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत कोणी कोथळा बाहेर काढला तर आश्चर्य वाटु नये, अशी स्थिती असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला मुख्यमंत्री पद मिळाले नाही, म्हणुन मी टिका करत नाही. तर मला जी भूमिका पटत नाही त्याचा मी विरोध करतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर सडकुन टिका केली.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुजरात दौऱ्यानंतर मोदींनी देशाचे पंतप्रधान व्हावे हे सांगणारा मी पहिला होतो. अशी आठवण सुध्दा राज ठाकरे यांनी सांगितली. तर 2019 मध्ये जेव्हा नोटबंदी, बुलेट ट्रेन आणि इतर विषयावर चुकले तेव्हा राजकीय टिका केल्याची स्पष्टोक्ती राज ठाकरे यांनी दिली. मोदी सरकारने केलेल्या चांगल्या कामाची वेळोवेळीच स्तुती केली. जम्मु काश्मीर मधुन 370 हटविल्यानंतर राज ठाकरे यांनी तारिफ केल्याचे सांगितले. तर एनआरसी च्या बाजुने मोर्चा काढुन पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले. जी भुमिका योग्य तीचे स्वागत, जी अयोग्य तिला विरोध करण्यात येईल असे ही ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे हे 1980 मध्ये इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. कुणाच्या भेटीला जाणे गैर आहे काय ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र आले पाहिजे असे म्हटल्यावर अमित शाह यांची भेट घेतल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. शिवसेना - भाजप यांची 1988-89 पासुन युती झाली तेव्हापासुन प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्या सोबत मैत्री असल्याचे ठाकरे म्हणाले.
निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा मी कधी करणार नाही. निशाणीवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा मात्र मी नकार दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कष्टाने मिळविलेल्या 'इंजिन' ला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे इंजिन शिवाय इतर चिन्हांवर तडजोड होणार नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेना ताब्यात घ्यायची असती तर तेव्हाच घेतली असती. असे म्हणत शिवसेनेवरचा ताबा आणि दावा एकप्रकारे सोडल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्य बाणावर निवडणुक लढविण्यावर राज ठाकरे (Raj Thackeray Gudhi Padwa Speech) यांचा एक प्रकारे नकार दिल्याचे चित्र होते. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पदावर कायम राहणार असे ठामपणे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली काम केले आता कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, असे ही ठाकरे यांनी सांगुन सर्व राजकीय शक्यतांना विराम दिला.
राज ठाकरे यांनी 2024 ची लोकसभा (Lok Sabha Election 2024) ही देशाला एकतर खड्यात टाकेल किंवा वरती नेईल, असे भाकित केले. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक तरुण असुन पुढील दहा वर्षात तरुणांची संख्या कमी होत ज्येष्ठत्वाकडे आपण जात आहोत. तेव्हा या दहा वर्षात जपान प्रमाणे घुसळुन टाकणारा विकास आपल्याला साधावा लागेल, असे ही राज ठाकरे म्हणाले. लोकसभेत ( Lok Sabha ) सरकारने दिलेली आकडेवारी सांगत देशातील सहा लाख उद्योगपती देश सोडुन जाणे ही चांगली परिस्थिती नाही. इतके उद्योगपती कोणाच्या सत्ता काळात देशाबाहेर गेले याचा ही तपशील जाहिर झाल्यास राज ठाकरे यांच्या भूमिकांवर टिका होण्याची दाट शक्यता आहे.
मराठी, मराठी माणुस आणि महाराष्ट्राविषयी कुठलीही तोडजोड करणार नाही. असे ठामपणे सांगत महाराष्ट्र सर्वाधिक कर देत असल्याने 'महाराष्ट्राला मोठा वाटा द्यावा', अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी मोदींकडुन व्यक्त केली. दक्षिणेतील कर्नाटकच्या खासदार, आमदारांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी दिल्लीत 'अन्याय' आंदोलन करत अशाच प्रकारची मागणी केली होती. विशेषतः कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांनी हा विषय रेटुन धरला होता. त्यावर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना 7 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार टिका केली. जादा कर देणाऱ्या राज्यांनी जादा कराची मागणी करणे हे देश तोंडण्यासारखे असनु उत्तर - दक्षिण अशा प्रकारे देशाचे विभाजन करण्याचा डाव असल्याचे मोदी म्हणाले होते. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांची महाराष्ट्राला सर्वाधिक करातुन जास्तीत जास्त निधी मिळण्याची मागणी मोदी मान्य करतील काय, असा प्रश्न निर्माण होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या शब्दात अशा प्रकारे जादा कर देणाऱ्या राज्यांनी जादा कराची मागणी करणे हे गैर असल्याचे सांगत देशाच्या एकात्मतेसाठी चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटक मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याप्रमाणे 'हमारा टॅक्स हमारा मनी' ही घेतलेली भूमिका भाजपला आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मान्य असेल काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. राज ठाकरे यांच्या या मागणीवर भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तर द्यावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.