Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीय समोरा-समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule अशी थेट लढत बारामतीत होत आहे. त्यामुळे या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यातच अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धमकविल्याचा आरोप केला जातोय. याच मुद्दावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांची तुलना थेट कुख्यात गँगस्टर अरूण गवळीशी केली आहे. Ajit Pawar work like Arun Gavali.
"अजित पवार Ajit Pawar लोकांना फोन करून दम देतात, लोकांच्या बदल्या करतात, घरी बस म्हणून निरोप देतात. यापूर्वी अरूण गवळी निवडणूक लढविताना दमदाटी करायचा. आता अजित पवार बारामतीचे अरूण गवळी झाले आहेत," असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांवर आरोप केले आहेत. आव्हाडांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांवर सडकून टीका केली.
"अजित पवार विरोधी पक्षनेते नव्हतेच. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचे प्रवक्ते होते. अजित पवार लबाड आहेत, हे शरद पवारांना सांगण्याची हिंमत माझी नव्हती. अजित पवार लबाडी करत होते, हे स्पष्ट दिसत होते," असंही आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केलं.
"नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात मी मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde यांच्या विरोधात 'एनआयटी'चा मुद्दा काढला होता. तो प्रचंड गंभीर प्रश्न होता. पण, ज्या पद्धतीनं अजित पवारांनी तो मुद्दा फिरवला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं, अजित पवार आपल्याला फसवत आहेत. बाहेर सांगायचे हा मुद्दा उचलूया आणि विधानसभेत डोळे मारायचे," असंही आव्हाडांनी सांगितलं.
"शरद पवारांच्या सगळ्या जवळील माणसांना दूर करण्याचं काम अजित पवारांनी केलं. अगदी यात बारामतीतील लोकांचाही समावेश आहे," असा आरोपही आव्हाडांनी अजित पवारांवर केला आहे. दरम्यान, धमकी देण्यात येत असलेल्या आरोपांवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"काही जण म्हणतात त्यांना धमकावलं जात आहे. मी कशाला धमकावू? आज अनेक जण म्हणतात मी पक्ष चोरला, आज 80 टक्के आमदार माझ्याबरोबर आहेत. कामे करण्याची ताकद कुणाकडे आहे? अजून 10 वर्ष कोण करू शकतं? बारामतीत काय करायचे हे तुम्ही ठरवा. बाकी पाच विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार आघाडीवर असेल," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.