Eknath Shinde ShivSena Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics: दोन मुद्यांमुळे एकनाथ शिंदे कसे कोंडीत सापडले?

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance:हिंदीची सक्ती न करता पर्याय ठेवा, सक्ती केली तर आम्ही त्या विरोधात आंदोलन करु, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर शिंदे हे काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष होते.

सरकारनामा ब्यूरो

गेल्या आठ दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे बंधुं एकत्र येणार का? शाळांमध्ये हिंदी सक्ती हे दोन विषय केंद्रस्थानी आहेत. या दोन्ही विषयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोडीं होत असल्याचे चित्र आहे.

नेहमीच कुठल्याही प्रश्नाला सडेतोड,तर कधी खोचक उत्तर देणारे शिंदे मात्र गेल्या आठवड्यात पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर चिडले. काही दिवसाचा घटनाक्रम पाहता शिंदे यांची कोंडी झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

राज-उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळत शिंदेंनी 'कामाचे बोला'असे सांगत काढता पाय घेतला. एरवी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणारे शिंदे आता बॅकफूटवर का गेले, हा चर्चेचा विषय आहे.

विशेष म्हणजे शिंदे यांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी राज्यातील पहिली ते पाचवीपर्यंतच्या मराठी , इंग्रजी शाळांमध्ये केलेल्या हिंदी सक्तीचा निर्णय त्यांचा अंगलट आला. या निर्णयाला सर्वात प्रथम त्यांचे 'परममित्र' असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सावध भूमिका घेत या प्रश्नाला उत्तर दिले. हिंदी सक्तीला विरोध झाल्यानंतर सरकारने याबाबत काढलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली.

हिंदीची सक्ती न करता पर्याय ठेवा, सक्ती केली तर आम्ही त्या विरोधात आंदोलन करु, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर शिंदे हे काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष होते. दरम्यान, शिंदे हे दरेगावला निघून गेले. तेथे त्यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याचा प्रश्न विचारताच त्याला उत्तर न देता शिंदेंनी त्याला उत्तर देणं टाळलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर ठाकरे बंधु एकत्र येत असेल तर चांगलेच आहे, अशी सावध प्रतिक्रया दिली.

मुंबईत भाजपचा महापौर व्हावा, असे अनेक वर्षांपासून भाजपचे स्वप्न आहे. आगामी निवडणुकीत भाजपसाठी सुवर्णसंधी होती. मुंबई ताब्यात घेण्यासाठी भाजपसमोर आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेना अडसर ठरत आहेत. हा अडसर शिंदेंनी शिवसेना फोडल्याने आता दूर झाला आहे. जागा वाटपात शिंदे गटासोबत मोठी वाटाघाटी भाजप करणार आहे. पण मध्येच ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची टाळी दिल्याने भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांचे टेन्शन अधिक वाढल्याचे दिसते.

पश्चिम आणि दक्षिणेतल्या राज्यात हिंदी बाबत अशा प्रकारचा जीआर निघालेला नाही, शिंदेंच्या मंत्र्यांने हा जीआर काढल्याने हिंदी सक्तीच्या विरोधातील वातावरण पेटलं. या निर्णयात बदल करीत राज्य सरकारने हिंदी भाषेच्या वापरासाठी 'अनिवार्य' हा शब्द वापरला होता. आता या शब्दाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे राज्य सरकारने आता स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच याबाबतची घोषणा केली आहे.दुसरीकडे ठाकरे बंधुंची युतीची चर्चा यामुळे शिंदे एकटे पडले.

ठाकरेंच्या युतीला मनसे नेते संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांनी विरोध केला आहे. ठाकरेंची युती होणार की नाही हे दोन्ही ठाकरे बंधु परदेशातून परत आल्यावर समजेल, पण शिंदेंची मात्र कोंडी झाली का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT