Maharashtra highest voting  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Highest Voting : मतदारांनी सगळी गणितं चुकवली! 30 वर्षांनी पहिल्यांदाच मतांचा विक्रमी टक्का

Voters break records with highest turnout in 30 years: या निवडणुकीत एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका देखील निवडणुकीत महत्त्वाची ठरली आहे.

Rashmi Mane

Maharashtra Vidhan Sabha Elction : राज्यात विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. याआधीही राज्यातील मतदारांनी नवा विक्रम केला आहे.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. या निवडणुकीत एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका देखील निवडणुकीत महत्त्वाची ठरली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 30 वर्षांनी यंदा विक्रमी मतदान झालं आहे. तर 1995 नंतर पहिल्यांदाच 65 % टक्क्यांच्या पुढे मतदानाचा आकडा गेला आहे. राज्यात यंदा 65.11% मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत मतदानात 3.67% टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मतदानात झालेली वाढ कोणाच्या पथ्यावर पडणार हे 23 नोव्हेंबरलाच कळणार आहे. मोठ्या संख्येने झालेल्या मतदानामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विजयाचा दावा करत आहेत.

महाराष्ट्रात मतदान

राज्यात मतदानाचा आकडा 65.1 टक्क्यांच्या पुढे गेला होता. यापूर्वी 1995 मध्ये 71.69% मतदान झालं होतं.

1999 मध्ये 63.44% मतदान

2009 मध्ये 59.68% मतदान

2014 मध्ये 63.38% मतदान

2019 मध्ये 61.44% मतदान झाले होते.

राज्यात प्रचंड मतदान होण्यामागे महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार कारणीभूत ठरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकीकडे महायुतीला ४२.१ टक्के तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती. सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर MVA मध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि सपा आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात, 'जेव्हा मतदानात वाढ होते तेव्हा भाजपला राजकीय फायदा होतो. मागील निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सिद्ध झाले आहे. याचा भाजप आणि महायुती यांना नक्कीच होणार आहे.

त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमव्हीएच्या विजयाचा दावा केला आहे. ते म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून, राज्याच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या सरकारला महाराष्ट्रातील स्वाभिमानी नागरिक निवडून देतील. जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे.

विशेष म्हणजे राज्यातील मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. 2019 मध्ये राज्यात 8.85 कोटी मतदार होते, ते आता 9.69 कोटी झाले आहेत. अशा स्थितीत मतदारांची संख्याही निवडणूक निकालात मोठी भूमिका बजावते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT