Maharashtra Assembly Exit Poll 2024 : राज्यात पुन्हा महायुती सरकार? एक्झिट पोलच्या अंदाजानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Mahayuti government likely after exit polls Thackeray group reacts: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.20) मतदान पार पडलं असून आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhansabha Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.20) मतदान पार पडलं असून आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अशातच निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला जास्त जागा मिळतील तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्का बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या अंदाजावर विविध पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

राज्यातील जनतेने आमचं आणि महाविकास आघाडीचं काम बघितलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेनं भरभरून मतदान केलं असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं बहुमताचं सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.

तर "एक्झिट पोलचे सर्व्हे काहीही आले तरी महाविकास आघाडीलाच स्पष्ट बहुमत मिळेल", असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं आहे. एक्झिट पोलच्या अंदाजांवर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, आम्ही काही एक्झिट पोल पाहिले.

Shivsena UBT News
Vidhansabha Election Exit Poll : एक्झिट पोलनुसार मुंबईवर वर्चस्व महायुती की महाविकास आघाडीचे ? काय सांगतात आकडे...

मात्र, ज्या प्रकारे आम्ही जमिनीशी जोडलेलो आहोत आणि आम्ही अनेक ठिकाणी जे पाहत आहोत. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. एक्झिट पोल काहीही आले तरी लोकांनी महायुतीला हटवण्याचा निर्णय घेतला असून महायुतीचा सुपडा साफ होणार आहे.

Shivsena UBT News
Maharashtra Assembly Election 2024 LIVE : मोदीजी, अदानींना आजच अटक करा!

त्यामुळे सर्व्हे काहीही आले तरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल.", असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा त्याचा फायदा भाजपला होतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com