Mangaldas Bandal-Amol Kolhe-shivajirao Adhalrao Patil
Mangaldas Bandal-Amol Kolhe-shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
विश्लेषण

Bandal On Adhalrao : आढळराव सगळे विसरून भेटायला आले; पण, ज्यांच्यासाठी केले ते मात्र विसरले : बांदलांचा खासदार कोल्हेंवर निशाणा

नितीन बारवकर

शिरूर : लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना टोकाचा विरोध केला. मात्र, सगळे विसरून ते भेटायला आले. फोनवरून ख्यालीखुशाली विचारली. ज्यांच्यासाठी केले ते मात्र विसरले, या शब्दांत माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी नाव न घेता खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यावर टीका केली. (Mangaldas Bandal's Criticism of MP Dr. Amol Kolhe)

सुमारे वीस महिन्यांनंतर कारागृहातून बाहेर आलेले बांदल यांनी आज शिरूरमध्ये पत्रकार परिषदेत घेतली. त्यात त्यांनी आपल्या जेलवारीबाबत भाष्य केले. याचवेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक कुणी कितीही अडविले तरी लढणारच अशी घोषणाही केली.

मागील लोकसभा निवडणुकीत बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रचारप्रमुख होते. विशेष म्हणजे तेही त्यावेळी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. मात्र, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीकडून त्यांची समजूत घालण्यात आली हेाती. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी झाले होते. त्यावेळी बांदलांनी आढळराव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचा संदर्भ आजच्या टीकेला होता.

बांदल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आढळराव यांना केलेल्या विरोधाचा आता पश्चात्ताप करून उपयोग नाही. पण, भविष्यात काय करायचे, ते करू. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आढळराव हे माणसातील माणूस आहेत. पराभव पत्करावा लागूनही ते कार्यरत आहेत, लोकांच्या सुख-दुःखात आवर्जून जातात.

पाठीवर वार काय करता, हिंमत असेल तर समोर येऊन लढा

शिक्रापूर परिसरातील घर बांधताना आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊनच बांधले होते. मात्र, मी जेलमध्ये जाताच बांधकामाची चौकशी करण्यात आली. पीएमआरडीएला सांगून घर पाडायला लावले. राजकारणात एखाद्याबद्दल घृणा, राग असू शकतो. पण, घरापर्यंत, कुटुंबापर्यंत जाऊन त्रास दिला, तर काळ माफ करणार नाही. राजकारणात एवढा दुस्वास बरा नव्हे. पाठीवर वार काय करता, हिंमत असेल तर समोर येऊन लढा, अशा कडक भाषेत मंगलदास बांदल यांनी आपल्या पारंपारिक विरोधकांना ललकारले. राजकीय आसूयेपोटी कुणाला तरी डॉमिनेट करायचे, खाली गाडायचे म्हणून तुम्ही जे करता त्याची परतफेड करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT