Modi Mauritius Visit sarkarnama
विश्लेषण

India Mauritius Relations - भारतापासून पाच हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावरील मॉरिशसला मोदी इतकं का महत्त्व देताय?

Modi Mauritius Visit - मार्चच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशसला गेले होते. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा प्रमुख पाहुणे होते.

Mayur Ratnaparkhe

 India Mauritius relations and Indian Ocean diplomacy - भारतापासून तब्बल पाच हजार किलोमीटरपेक्षाही अधिक दूर असणारा आणि केवळ १२ लाख लोकसंख्येचा, त्यातही ४८ टक्के हिंदू धर्मांचे आहेत. जो हिंद महासागर क्षेत्रात येतो आणि भारताच्या धोरणात्मक विकासात ज्याला महत्त्व आहे, तो देश म्हणझे मॉरिशस. सध्या पंतप्रधान मोदींचे मॉरिशसकडे विशेष लक्ष दिसत आहे. ते दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असून, मॉरिशयसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्याशीही फोनवर संवाद साधलेला आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली. मोदींनी म्हटले की, माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी बोलून मला आनंद झाला. भारत-मॉरिशस धोराणात्मक भागीदारी व प्रादेशिक विकास अधिक मजबूत करण्यावर आम्ही विचारांचे अदानप्रदान केले. भारताच्या व्हिजन ओशन आणि आमच्या नेबरहूड फर्स्ट धोरणात मॉरिशस हा एक प्रमुख भागीदार आहे. ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनात रामगुलाम यांच्या मनापासून सहभागाबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान रामगुलाम यांना लवकरच भारत भेटीचे आमंत्रण दिले आणि दोन्ही नेत्यांनी जवळच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले. मार्चच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशसला गेले होते. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा प्रमुख पाहुणे होते. २०१५ मध्ये ते पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून मॉरिशयसला गेले होते. या समारंभात मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखूल यांनी पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता. एखाध्या भारतीय नेत्याला हा प्रतिष्ठित पुरस्करा मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

जागतिक व्यापर, ऊर्जा आणि लष्करी रणनीतीसाठी हिंद महासागर प्रदेश त्याच्या शिपिंग मार्गांमुळे, संसाधनांमुळे महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेत भारता या प्रदेशावरील आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आपली सागरी धोरणे सतत मजबूत करत आहे. मागील दशकात भारताने आपली सागरी रणनीती बदलली आहे. इंडो-पॅसिफिक व हिंद महासगार प्रदेशात चीनच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी रणनीतीतील बदल दिसतो.

महासागर मॉरिशससारख्या लहान बेट राष्ट्रांसोबत भारताची भागीदारी मजबूत करतो, जेणेकरून ते भारतीय हितांपासून दूर जाऊ नयेत. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सागरी सुरक्षा मजबूत करणे. भारतीय नौदलाचे वाढलेले सराव, माहितीची देवाणघेवाण, संरक्षण सहकार्य आणि हिंद महासागरावरील देखरेख यामुळे चाचेगिरी, बेकायदेशीर मासेमारी, लष्करी विस्तार आणि इतर धोक्यांपासून त्याची सुरक्षा वाढते.

 संकटाच्या काळात भारत नेहमीच मॉरिशसच्या पाठीशी उभा राहिला आहे. मग तो कोरोना काळ असो किंवा वाकाशियो तेल गळती असो. २२ जानेवारी २०२१ रोजी मॉरिशसला कोविशिल्ड लसींचे १ लाख डोस मोफत पुरवणारा भारत हा पहिला देश होता, त्यानंतर कोविशिल्डचे १ लाख डोस आणि कोव्हॅक्सिनचे २ लाख डोस व्यावसायिक आधारावर पुरवले गेले. २००५ पासून भारत मॉरिशसच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT