Nitin Nabin with Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Bankipur Assembly by-election : भाजपच्या बालेकिल्यात होणार घमासान; उमेदवार मातब्बर, विरोधकांची एकी झाल्यास निकाल फिरणार?

Bankipur bypoll, Bihar Assembly by-election, Jan Suraaj : जनसुराज पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उतरवूनही एकही जागा मिळाली नव्हती.

Rajanand More

Prashant Kishor news : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सध्या उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांतील विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे. पुढील वर्षी या राज्यांत होत असलेल्या निवडणुकांसाठी त्यांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी नवीन यांच्या बालेकिल्यातच त्यांचे टेन्शन वाढविल्याची चर्चा आहे.

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. नितीन नवीन यांचा हा बालेकिल्ला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदा पाठोपाठ त्यांना राज्यसभेचेही तिकीट मिळाले. त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. याच मतदारसंघात आता पोटनिवडणूक होत असून जनसुराज पक्षाने राजकीय रणनीतीकार व पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या विजयासाठी रणनीती आखली आहे. आता ते पहिल्यांदाच स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बांकीपूर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अद्याप भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाकडून उमेदवाराचे पत्ते उघडले नाही. मात्र, विरोधकांनी एकत्र येत प्रशांत किशोर यांना पाठिंबा दिल्यास भाजपसाठी ही निवडणूक जड जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

निवडणुकीत कुणाशीही आघाडी करणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले असले तरी इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यास नाही म्हणणार नाही, असे स्पष्टीकरणही दिले आहे. बांकीपूर या भाजपचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेस किंवा राजदने उमेदवार दिल्यास विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ त्याचा थेट फायदा भाजप उमेदवाराला होईल, असा सूर उमटत आहे.

काँग्रेस आणि राजदची राज्यात आघाडी आहे. या आघाडीने प्रशांत किशोर यांना पाठिंबा दिल्यास ही निवडणूक हायहोल्टेज ठरू शकते. कदाचित निकालही फिरू शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. त्यातच हा मतदारसंघ भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आहे. त्यामुळे काँग्रेस-राजदची भूमिक महत्वपूर्ण ठरणार आहे.

प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक केवळ एका मतदारसंघापुरती राहिली नाही. जनसुराज पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उतरवूनही एकही जागा मिळाली नव्हती. पण आता खुद्द प्रशांत किशोर मैदानात उतरल्याने पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT