Mumbai News : चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघडीला मोठा पराभव सहन करावा लागला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद मिळवण्या इतपतही संख्याबळ गाठता न आल्याने महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यातच महाविकास आघाडीतील तीन पक्षाकडील अनेक नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत असल्याने सध्या आहे ते संख्याबळ टिकवण्यासाठी आघाडीतील घटक पक्ष तारेवरची कसरत करताना दिसत आहेत.
त्यातच जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. तर पहलगामच्या मुद्द्यावरून मविआमधील मतभेद समोर आले आहेत. त्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) केंद्र सरकारबरोबर आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या निशाण्यावर सरकार असल्याचे पाहायला मिळते. या दोन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी वक्फच्या विधयेकावरूनही महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) या तीन पक्षांची मते वेगवेगळी पाहवयास मिळाली होती. त्यानंतरच आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर मविआमधील मतभेद समोर आले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकरने पाकिस्तानविरुद्धचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाकिस्तानसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यातच केंद्र सरकारने महत्त्वाचे पाच निर्णय घेत पाकची कोंडी केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हते. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षाचे खासदार उपस्थित होते. यावेळी सर्वच विरोधी पक्षांनी येत्या काळात केंद्र सरकार जी काही पावले या सगळ्या घटनेनंतर उचलेल, त्याला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला. दुसरीकडे मात्र, ठाकरे गटाचे खासदार या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकरे गटावर टीका करण्याची संधी मिळताच सत्ताधारी पक्षांनी आरोप केले आहेत. या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत? या बाबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्हीही सभागृह नेते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे हे दोघेजण या महत्वाच्या बैठकीला गैरहजर होते. त्याबाबतचे स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिले. त्यामुळे काही अंशी या वादावर पडदा पडला असला तरी ठाकरे गटाच्या नेत्यांनी बैठकीला उपस्थित राहून त्यांचे मत मांडायला हवे होते.
त्यानंतर पहलगाम मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दहशतवाद्यांना शोधणं हे महत्त्वाचे आहे. कुणाला काढा कुणाला ठेवा, हे मी बोलणार नाही, असे पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरून त्यांनी हे उत्तर दिले आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत रोज पहलगामवरून सरकारला घेरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद त्यावरून उघड झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.