CM post Bawankule : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही केव्हा होणार ? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले 'हे' उत्तर...

Chandrashekhar Bawankule news : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री असल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव यासाठी घेतले जाते.
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा अधूनमुधून राज्यात सुरू असते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्यापही नाराज असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर कधीच भाष्य करीत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री असल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव यासाठी घेतले जाते. यावर बावनकुळे यांनी महायुती सरकार आणि स्वतःची भूमिका स्पष्ट केली.

सध्या महायुतीचे चांगले सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेतला आहे. तोपर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असे मत बावनकुळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.

बावनकुळे म्हणाले, 'एका काँग्रेसच्या नेत्याने माझ्याकडे कालच तुम्ही मुख्यमंत्री झाला पाहिजे,' अशी भावना व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. पुढील पंधरा वर्षे महायुतीचे सरकार कायम राहिले पाहिजे, अशा आमच्या भावना आहेत. त्याकरिताच आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. महाराष्ट्राला झपाट्याने पुढे नेत आहोत,' असेही बावनकुळे म्हणाले.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Thackeray brothers : ठाकरे बंधूंना घडवणार राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे दर्शन

'देवेंद्र फडणवीस गतिमान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा, अशी सर्वांची भावना आहे. महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत,' असे यावर मी त्या नेत्याला उत्तर दिल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar Warning : अजितदादांनी दम भरल्यानंतर तरी अधिकारी सुतासारखे सरळ होणार का ?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार आहेत, युती करणार आहेत, यावर बावनकुळे म्हणाले, 'तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. दोन भावांची युती होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP Vs NCP : फक्त चार माजी आमदाराच नाही तर अजितदादांनी भाजपचा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षही फोडला; राष्ट्रवादीची ताकद वाढली

भाजपचे 31 जिल्हाध्यक्ष, 1280 मंडळ गठित होतील. राज्य सरकारचे 108 महामंडळ आहेत. 765 अशासकीय सदस्य आहेत, वेगवेगळ्या महामंडळावर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी आहेत. साधारणतः महायुतीमध्ये तीन ते पाच हजार कार्यकर्ते विविध पदावर येऊ शकतात. यासाठी महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकारी सर्व बसून येत्या दोन महिन्यात सर्व शासकीय समित्या, महामंडळ केंद्रीय भाजपच्या परवानगीने जाहीर करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Pahalgam Terror Attack : नागपूर, मुंबई अन् पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांना राज्य सरकारनं शोधलंच; 48 तासांनंतर भारतात राहण्यास बंदी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com