Shivsena Politics : ठाकरेंचा पैलवान शिंदेंच्या पंगतीत; उदय सामंतांनी आणखी एक कुस्ती मारली!

Chandrahara Patil Meets Eknath Shinde : डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान चंद्रहार पाटील यांचा शिवसेना पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. नुकतीच त्यांनी कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडणार असल्याचे सांगितले होते.
Shivsena UBT, Uday Samant
Shivsena UBT, Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 26 Apr : डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान चंद्रहार पाटील यांचा शिवसेना पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. नुकतीच त्यांनी कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडणार असल्याचे सांगितले होते.

उदय सामंत यांचा पुढाकार :

चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. यावेळी दोघांनी एकत्र जेवण देखील केलं. मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ही भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सामंत यांनी आणखी एका नेत्याला पक्षात आणून पक्षवाढीला हातभार लावला आहे. यापूर्वी पुण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचाही शिवसेना प्रवेश सामंत यांच्याच माध्यमातून झाला होता.

Shivsena UBT, Uday Samant
Shivsena News : खळबळजनक ! शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

सांगली मतदारसंघातील निवडणूक गाजली :

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत राहिला. काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्याकडे घेत इथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही जाहीर केली होती. त्यामुळे राज्यात महाविकाह आघाडी असतानाही सांगलीत मात्र मित्र पक्षांमध्ये धुसफूस पाहायला मिळाली होती.

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. तरी देखील ही जागा ठाकरेंनी पैलवान पाटील यांनाच दिली. त्यानंतरचा निकाल सर्वांना माहिती आहे. मात्र, निकालानंतरही पैलवान पाटील हे सतत खासदार संजय राऊत यांच्यासोबत असल्याचं दिसून आलं.

Shivsena UBT, Uday Samant
Dharmaravbaba Atram Statement: धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाबाबत केलं मोठं विधान अन् राजकीय चर्चांना आलं उधाण!

मात्र, राऊतांबरोबर सावलीप्रमाणे राहणारे हेच पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान या चर्चांवर चंद्रहार पाटलांनी उद्धवसाहेबांनी मला खूप साथ दिली, मोठी ताकद दिली ते मान्यच करावे लागेल. पण भविष्याचा विचार केल्यास क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करण्यासाठी सरकारची गरज लागते. त्यामुळे सत्तेत जावं लागेल, असं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com