PM Modi Visit RSS Headquarters sarkarnama
विश्लेषण

PM Modi Visit RSS Headquarters : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संघ कार्यालयाला भेट, भाजप अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लागणार!

PM Narendra Modi BJP Presidency Issue RSS : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मागील दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयात आले नव्हते. मात्र, ते आत्ताच आल्याने त्याला वेगळीच पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.

Roshan More

BJP Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालायाला भेट दिली. त्यांनी पहिले सरसंघचालकांचे स्मृतीस्थळ असलेल्या स्मृती मंदिरामध्ये जात अभिवादन देखील केले. विशेष म्हणजे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा संघाच्या मुख्यालयात गेले. त्यामुळे त्यांची ही भेट वेगवेगळ्या कारणाने महत्त्वपूर्ण आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. भाजप जेव्हा शक्तिशाली नव्हता तेव्हा संघाने मदत केली होती. मात्र, आता भाजप स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे भाजप आणि संघामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे बोलले गेले होते. संघाकडून ही संघपरिवारातील अंतर्गत मामला असल्याचे सांगत यावर अधिक बोलणे टाळले होते.मात्र, संघ लोकसभा निवडणुकीत सक्रिय नसल्याचा फटका भाजपला बसला होता. आणि भाजप स्वबळावर सत्तेपासून लांब राहिला.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील आपल्या विविध भाषणांमधून नाव न घेता पंतप्रधान मोदींना कानपिचक्या दिल्या होत्या. सेवकाच्या रुपामध्ये सेवा करत राहिले पाहिजे, असे ते म्हटले होते. त्यामुळे संघापासून भाजप दूर जात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीत संघाने भाजपला मदत करत दोन्ही राज्यात पुन्हा सत्ता मिळवून दिली होती.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मागील दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयात आले नव्हते. मात्र, ते आत्ताच आल्याने त्याला वेगळीच पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते हे संघाचे शताब्दीवर्ष आहे. त्या निमित्ताने संघाचा स्वयंसेवक पंतप्रधानपदी विराजमान असल्याने भेटीची संधी त्याला चालून आली असणार त्यामुळे या भेटीचे वेगळे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

भाजपचा अध्यक्ष संघ ठरवणार?

भाजपचे प्रभारी अध्यक्षपद हे जेपी नड्डा यांच्याकडे आहे. भाजपला पूर्ववेळ अध्यक्ष कधी मिळणार याची देखील चर्चा आहे. मात्र, अध्यक्ष नेमताना तो मोदी-शहांच्या मर्जीतील की संघाच्या मर्जीतील असणार हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या भेटीमुळे भाजपच्या अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

भेटीतून कार्यकर्त्यांना संदेश

भाजप सत्तेत असला तरी भाजप ही राष्ट्रीय स्वंयमसेवक संघाची राजकीय शाखा असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येते. भाजपमधील नेत्यांनी देखील संघासोबतचे नाते कधी लपवून ठेवले नाही. मात्र, मागील दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयात न गेल्याने भाजप स्वतःच्या पायांवर उभा राहून स्वतंत्र राजकारण करू शकतो, याची चर्चा होती. जेपी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर या चर्चेला अधिक जोर आला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी संघ मुख्यालयाला भेट देत संघ आणि भाजप यांच्यातील नाते अतुट असल्याचा संदेश भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT