
Armed Forces Special Powers Act extension : गृहमंत्रालयाने मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी सहा महिन्यांसाठी सशस्त्र दल विशेषाधिकार अधिनियम (AFSPA) लागू केला आहे. यामध्ये मणिपूरच्या पाच जिल्ह्यांसाठी 13 ठाणे क्षेत्रांना सोडून संपूर्ण राज्यात AFSPA पुढील सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.
तर अरुणाचल प्रदेशचे तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्हे तसेच राज्यातील तीन पोलिस ठाणे क्षेत्रातही AFSPA लागू केला गेला आहे. याशिवाय नागालँडच्या ज्या जिल्ह्यांमध्ये AFSPA पुन्हा एकदा लागू केला गेला आहे, ते दीमापूर, निउलँड, चुमौकेदिमा, मोन, किफिर, नोकलाक, फेक अन् पेरेन आहेत.
'AFSPA' कायदा अशांत भागात लागू केला जातो. या कायद्याच्या अंतर्गत सुरक्षा दलांना एक महत्त्वपूर्ण ताकद मिळते. या अंतर्गत सुरक्षा दलांकडे विना वॉरंट कुणालाही अटक करण्याचा अधिकार असतो. तसेच या कायद्यानुसार अनेक बाबतीत बळाचा वापर करण्याचाही अधिकार असतो. AFSPA केवळ अशांत भागातच लागू करता येतो.
आफ्सपा(AFSPA) कायदा सुरक्षा दलांना कोणत्या व्यक्तिस विना वॉरंट अटक करणे, विना वॉरंट एखाद्या परिसरात प्रवेश करणे किंवा तपासणी करणे आणि अन्य कारवाई करण्याचा अधिकार देतो. याचबरोबर हा कायदा गरज पडल्यास गोळी चालवण्याचाही अधिकार देतो.
याशिवाय सुरक्षा दलांनाही हा देखील अधिकार आहे की, जर कोणताही उग्रवादी किंवा उपद्रवी एखाद्या घरात दडलेला आहे तर ते घर उध्वस्तही करू शकतात. या कायद्यांतर्गत कारवाई तेव्हाच शक्य आहे, जेव्हा केंद्र सरकारने तो एखाद्या अशांत क्षेत्रात लागू केलेला असेल.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.