Pramod Sawant  Sarkarnama
विश्लेषण

प्रमोद सावंतांनी सांगितली भाजप सरकार स्थापनेची स्ट्रॅटेजी!

गोव्यात भाजपचे पुन्हा सरकार येणार हे निश्चित आहे. आता मुख्यमंत्री कोण बनणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात पहिल्या टप्प्यात पिछाडीवर पडलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी अखेर ५०० मतांनी बाजी मारली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचे सरकार बनविण्याची स्ट्रॅटेजी सांगितली. (Pramod Sawant announces BJP government formation strategy!)

गोव्यात भाजपने २० जागांवर आघाडी कायम राखली असून बहुमतासाठी गोव्यात २१ जागांची आवश्यकता आहे. या ठिकाणी काँग्रेस ११, मगो २ आप २ गोवा फॉरवर्ड एक, तर तीन अपक्ष आघाडीवर आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपचे पुन्हा सरकार येणार हे निश्चित आहे. आता मुख्यमंत्री कोण बनणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे पहिल्या चार फेरीपर्यंत प्रमोद सावंत हे पिछाडीवर होते. मात्र, चौथ्या फेरीनंतर सावंत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांची काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलांनी यांच्याशी ‘काँटे टक्कर’ लढत झाली. शेवटी सावंत हे ५०० मतांनी जिंकले. निवडणूक निकालानंतर माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की माझ्या विजयाचे श्रेय हे माझे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाला जाते. मी मतदारसंघात नसतानाही त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे. गोव्याच्या जनतेने विकासासाठी भाजपला पुन्हा कौल दिला आहे. अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष यांना सोबत घेऊन आम्ही गोव्यात सरकार स्थापन करणार आहोत.

दरम्यान, काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले विश्वजित राणे यांनी पुन्हा एकदा आपली कमाल दाखवून दिली आहे. विश्वजित हे स्वतः वाळपई मतदारसंघातून ७ हजार मतांच्या फरकांनी जिंकले आहेत. त्यांची पत्नी दिव्या राणे ह्या पर्ये मतदारसंघातून जवळपास १४००० मतांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे विश्वजित राणे यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी निवडणुकीच्या दरम्यान चर्चेत आले होते.

गोव्याच्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होईल, असा विश्वास विश्वजित राणे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर व्यक्त केला. 'गोव्याची ही निवडणूक आम्ही जिंकू. लोकांनी घोटाळेबाजांना, बाहेरच्या लोकांना नाकारले आहे. त्यांनी गोव्यातील लोकांसाठी काम करणाऱ्या पक्षाला मतदान केले आहे,' असे राणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT