शिवसेनेने आता २ खासदार अन्‌ २० आमदार निवडून आणून दाखवावेत :भाजपचे खुले आव्हान

यूपी तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है : भाजप नेत्यांची घोषणाबाजी
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने (bjp) पाचपैकी चार राज्यांत आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये आपने काँग्रेसला धक्का देत सत्ता काबीज केली आहे. चार राज्यांत आघाडी घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ‘यूपी तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशी घोषणाबाजी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केली. माजी मुख्यमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याचा पुनरुच्चार केला आहे. (Girish Mahajan's open challenge to Shiv Sena)

भाजपने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपच्या या यशामुळे राज्यातील नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला या निकालाने बळ दिले आहे. भाजपने आघाडी घेतल्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशी घोषणा दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा इशारा मानला जात आहे. पाच राज्यात काँग्रेस पक्षाला एकूण ३५ जागाही मिळणार नाहीत, असा दावा महाजन यांनी केला आहे.

Girish Mahajan
उत्पल पर्रीकरांना पणजीकरांनी नाकारले; फडणवीसांची खेळी यशस्वी!

महाजन म्हणाले की, भाजपवर लोकांना विश्वास असल्याचे या निकालातून दिसून येत आहे. शिवाय नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाने मान्य केलं आहे. पाचपैकी पंजाब वगळता चार राज्यांत भाजपने बाजी मारली आहे. पाचही राज्यात काँग्रेसने जवळपास ६९० जागा लढवल्या आहेत, त्यातील ३५ जागाही त्यांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसची एवढी वाईट अवस्था झालेली आहे.

Girish Mahajan
भाजपच्या धमाकेदार विजयाची ठाकरे सरकारला धास्ती : दहा मार्चनंतर राज्यातही घडामोडी

भाजपच्या पाठीत खंजीर खूपसून शिवसेना पक्ष सत्तेवर आला आहे. बडबड करण्याशिवाय त्यांना दुसरे काहीही जमत नाही. आगामी निवडणुकीत शिवसेनेने दोन खासदार आणि २० आमदार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान महाजन यांनी शिवसेनेला दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com