Sangli district Shocking Crime News sarkarnama
विश्लेषण

Sangli Crime : सांगली सुन्न! बापानेच मुलीचा घेतला बळी, तर 16 वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या; आता पोलिसांची कसोटी

Sangli district Shocking Crime News : नेलकरंजीत बापाने स्वतःच्या मुलीला सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बेदम मारहाण केली होती. त्यातच तिचा जीव गेला होता. या प्रकरणाने जिल्हा हळहळला आणि हादरला होता. तोच दुसरी धक्कादायक घटना घडली होती.

Aslam Shanedivan
  1. सांगलीतील नेलकरंजी येथे एका शिक्षक बापाने सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला.

  2. अडपाडी येथे चार तरुणांनी एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक व मानसिक अत्याचार केल्यामुळे तिने आत्महत्या केली.

  3. या दोन घटना समाजमन हादरवणाऱ्या असून पोलिसांची भूमिका आणि पुढील तपास याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नागेश गायकवाड (आटपाडी) : सांगली जिल्हा सध्या दोन घटनांमुळे सुन्न झाला आहे. आधी नेलकरंजीत शिक्षक असणाऱ्या बापानेच मुलीचा बळी घेतला. कारण फक्त मुलीला सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या होते. तर अडपाडीत गावातील चार तरूणांच्या लैंगिक आणि मानसिक अत्याचारास कंटाळून 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या प्रकरणाने जिल्हा हळहळला आणि हादरला होता. यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट अद्याप ओसरलेली नसून अशा प्रकरणांच्या पाळेमुळापर्यंत पोलीस पोचणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.

नेलकरंजीत बापाने स्वतःच्या मुलीला सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बेदम मारहाण करून जीव घेतला होता. या प्रकरणाने जिल्हा हळहळला आणि हादरला होता. हे ताजे प्रकरण असतानाच अन्य एका शालेय विद्यार्थिनीचा नराधमाच्या टोळीने बळी घेतला. यामुळे आता शालेय आणि अल्पवयीन मुलीची सुरक्षतीता धोक्यात असल्याची घंटा घुमत आहे.

तालुक्यात काही गावात वाया गेलेल्या तरुणांच्या टोळ्या शालेय विद्यार्थिनींच्या शिकारीच्या शोधात असतात. भलेही बदनामी पोटी अशा घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पण अशा घटना होतच नाहीत असे म्हणणे योग्य नाही. अशा घटनांवर गावातच पडदा टाकला जातो. त्यामुळे या टोळ्यांचे बळ वाढते. अटपाडीतील घटनेतील टोळी याचेच एक उदाहरण आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी वेळीच जालीम इलाज करण्याची आवश्यकता आहे.

"त्या"शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता मोठी आहे. बेकरीमध्ये दिवसभर सावजाच्या शोधात बसत असलेली टोळी मोठी आहे. घटनेत संशयीत गायकवाडच्या फोनवरून मेसेज करून त्रास देणाऱ्यापर्यंत खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोलीस अजून पोहोचले नाहीत. टोळीतील चौघा शिवाय अन्य सहभाग आहे. याचा तपास होण्याची गरज आहे.

शिवाय मुख्य आरोपी राजू गेंड याला ग्रामस्थांनी पकडल्यावर त्याच्या मोबाईलमध्ये 25 वर आक्षेपहार्य व्हिडिओ सापडलेत. त्यादृष्टीने अन्य कोणाचा बळी घेतला का? याचाही तपास करण्याची गरज आहे. अनेक गावात अशा टावळखोर तरुणांच्या टोळ्या सक्रिय आहेत. आटपाडी शहरास अन्य गावात शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करणे, बस स्टैंडवर त्रास देणे, असे प्रकार सुरू आहेत.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

या प्रकरणात आटपाडीचे पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पोलिसांची भूमिका पहिल्यापासूनच संशयस्पद राहील. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोबाईलवरील पुरावे दाखवले तरी अत्याचार आणि पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. दोन दिवस ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर तळ ठोकला. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांनी पोलिसांची झाडाझडती घेतल्यावर पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

घटनेतील दोन्ही आरोपी गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेत. संपूर्ण प्रकरणातच पोलिसांची भूमिका आरोप यांना वाचवण्याचा दृष्टीने होती. त्यामुळे घटनेची व्याप्ती आणि अन्य कोणाचा बळी गेला का याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतंत्र पथक नेमावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तरच घटनेच्या मुळापर्यंत पोहोचून नराधमांना कठोर शिक्षा होईल. त्याचा समाजात चांगला संदेश जाईल अन्यथा अल्पवयीन मुलीची सुरक्षितता अशीच धोक्यात राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT