
Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झालेल्या धक्कादायक घटनेची चर्चा आता राज्यभर होऊ लागली आहे. येथे एका 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गावातील चार युवकांच्या शारीरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. यानंतर आता या प्रकरणात पसार असणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी अटक केली होती.
यानंतर तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून युवकांच्या मोबाईल फोनमध्ये 25वर अत्याचाराचे व्हिडिओ सापडले आहेत. यामुळे यात टोळी मोठी असण्याची शक्यता असून चौघांसह इतरांनी गावातील आणखी मुलींवर अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीने तपास करण्याची आता मागणी केली जातेय. (Atpadi Sexual Assault and Suicide Case: Shocking Discovery of Over 25 Obscene Videos of Assaults on Accused's Mobile Phone)
आटपाडी तालुक्यातील एका गावात 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी (Student) आत्महत्या केली होती. तर गावात बेकरी असणाऱ्या राजू गेंडसह त्याचे मित्र रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात, अनिल नाना काळे तिला सततचा त्रास देत होते. राजू गेंड याने या मुलीवर बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर त्या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. त्याच व्हिडिओच्या माध्यमातून तिला मानसिक आणि शारीरीक त्रास दिला जात होता. ज्यातून तिने आत्महत्या केली. शेवटच्या रात्रीही त्या नराधमांनी त्या व्हिडिओवरून तिला धमकी दिली होती. तिला त्रास दिल्याचे समोर आले होते.
आता त्यापेक्षाही धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्या नराधमांच्या मोबाईल फोनमध्ये 25 पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या टोळक्याने अनेक मुलींना त्रास दिला असणार या चर्चेला आला या व्हिडिओंमुळे स्पष्टता येताना दिसत आहे. पण अद्याप ते व्हिडिओ गावातील मुलींचेच आहे का याचे सत्य समोर आलेले नाही. दरम्यान या प्रकरणातील प्रसार असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी (Police) अटक केलीय. त्यांना न्यायालयाने दोघांनाही 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या घटनेनंतर भाजपकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तर भाजपच्या नीता केळकर आणि अँड. स्वाती शिंदे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पोलीस ठाण्याला भेट देऊन आढावा घेतला. तसेच गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांची झाडाझडती गेतल्यानंतर आरोपींवर पोक्सातर्गत, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुख्य आरोपी राजू गेंड याची बेकरी असून त्याच्या मागे एक खोलीही आहे. ही बेकरी आणि खोलीच या टवाळखोरांचा अड्डा होता. येथे हे चौघे गावातील मुलींना त्रास देत बसत. तर राजू गेंड . बेकरीत लहान मोठ्या मुलींना बोलून कॅडबरी चॉकलेट देऊन मागच्या खोलीत घेऊन जात असे. आतातर त्याच्या मोबाईलमध्ये 25 वर अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ सापडले असल्याने बेकरीतील सीसीटीव्हीचा डीडीआर जप्त करून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तसेच पोलिसांनी कोणताही दबाव न घेता योग्य तापस केल्यास गुन्ह्याची व्याप्ती आणि यात इतर कोणाचा सहभाग आहे का? याचाही सोक्षमोक्ष लागेल असा दावा केला आहे.
दरम्यान या आत्महत्येप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक नियुक्ती करावी, सकल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी अधिवेशनात केलीय. बाबर यांनी, या प्रकरणात कोणाचा पोलीस निरीक्षकावर कोणाचा दबाव होता का? याचाही तपास व्हावा, सीडीआर काढावा अशी लक्षवेधी मांडली.
या मागणीने खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दोन दिवस विलंब का लावला? याचे खरे गुपित आता उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलीस अधीक्षकांना घटनेचा सखोल आणि सविस्तर तपास करून तसेच प्रकरणाची असलेली मोठी व्याप्ती तपासून त्याचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.