Sangli Crime : 'डॉक्टर' व्हायचं होतं तिला… पण सराव चाचणीनं केला घोळ! चिडलेल्या बापाची अमानुष मारहाण; 17 वर्षांच्या लेकीचा मृत्यू!

Dream of Becoming Doctor Ends in Tragedy in Sangli : सध्या मुलांना त्यांच्या अभ्यास आणि गुणांवरून पालक चांगलेच धारेवर धरताना आणि मारहान करताना दिसतात. असाच एक प्रकार सांगलीत देखील घडला असून यात एका वर्षांच्या लेकीचा मृत्यू झाला आहे.
Sangli Crime News
Sangli Crime Newssarkarnama
Published on
Updated on

Sangli News : नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. साधाना धोंडीराम भोसले (वय -17) असे मृत मुलीचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावातील ही घटना आहे. आटपाडी पोलिसांनी वडील धोंडीराम भोसले याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धोंडीराम भगवान भोसले हे गावातीलच माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. तर आई प्रीती या गावच्या माजी सरपंच आहेत. दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगी साधना ही शिक्षणात हुशार होती. दहावीत 92.60 टक्के मिळवून शाळेत तिने पहिला क्रमांक काढला होता.

त्यानंतर ती आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिची तयारी सुरू होती. त्यासाठी तिला खासगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. ज्यात तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे वडील चांगलेच चिडले होते.

शुक्रवारी (ता.20) रात्री वडील धोंडीराम यांनी कमी गुण का मिळाले? याचा जाब विचारला. एवढा खर्च करतोय, कशी डॉक्टर होणार? तुझं कसं होणार? असे प्रश्न करत आक्रमक पवित्रा घेतला. साधना हिने, ‘पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळत होते. तुम्ही काय कलेक्टर झालात का? शिक्षक झालाच ना?’ असे उलट उत्तर दिल्याने वाद वाढला.

Sangli Crime News
Sangli Crime : लूटमार 3 लाखांची तपासात सापडले 2.5 कोटी; पोलीस देखील चक्रावले

या रागातून चिडलेल्या वडिलांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुट्याने बेदम मारहाण केली. पोटात लाथा घातल्या. पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते काही वेळ थांबले. पण तासाभराने पुन्हा मारहाण केली. त्या रात्री त्यांनी मुलीला अनेकवेळा त्यांनी वारंवार जबर मारहाण केली. या मारहाणीत साधनाच्या डोक्याला जबर मार लागला. संपूर्ण शरीराला इजा झाली.

मात्र तिला शनिवारी दवाखान्यात दाखल केले नाही. यानंतर शनिवारी धोंडीराम शाळेतील योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले. घरी गेल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यावेळी तिला सांगलीतील एका दवाखान्यात दाखल केले. यावेळी धोंडिराम यांनी मुलगी बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचे कारण सांगून बनाव रचला.

Sangli Crime News
Sangli Crime : थकीत पगार मंजुरीसाठी शिक्षकाने लाखाची तर मदतीसाठी पोलिसाने घेतली 25 हजारांची लाच

मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. यानंतर डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला. यात गंभीर मारहाण झाल्यामुळे अंगावर जखमा झाल्याचे नमूद केले. तसेच डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. यानंतर आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे धोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केली असून 24 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com