Sangram Thopate .jpg Sarkarnama
विश्लेषण

Sangram Thopate : ...म्हणून भोरमध्ये थोपटेंना जिव्हारी लागणाऱ्या पराभवाचा सामना करावा लागला!

Bhor Assembly Election 2024 : भोर मतदारसंघात वाढलेली मतदार संख्या आणि भोर व वेल्हे तालुक्यांतून 73 टक्के मतदान होऊनही आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. भोर तालुक्यातील संग्राम थोपटे यांचे सर्व विरोधकांनी एकजुटीने शंकर मांडेकर यांचा प्रचार केला.

Deepak Kulkarni

Bhor News : भोर मतदारसंघात महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी 19 हजार 638 मतांनी पराभव केला. सलग तीनवेळा आमदार राहिलेले संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांचा भोर तालुक्यात नवीन चेहरा असलेल्या शंकर मांडेकर यांनी दारुण पराभव केल्यामुळे केवळ संग्राम थोपटेच नव्हे तर कॉँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची चर्चा सुरु आहे.

भोर मतदारसंघात वाढलेली मतदार संख्या आणि भोर व वेल्हे तालुक्यांतून 73 टक्के मतदान होऊनही आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. भोर तालुक्यातील संग्राम थोपटे यांचे सर्व विरोधकांनी एकजुटीने शंकर मांडेकर यांचा प्रचार केला. भोर आणि वेल्हा तालुक्यांतील कॉँग्रेसप्रेमींना (Congress) हा पराभव जिव्हारी लागला आहे.

यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतानाही विधानसभेचे अध्यक्षपद नाही, मंत्रिपद नाही आणि कुठल्याही महामंडळाचे अध्यक्षपदही मिळाले नाही. आणि राज्यात महायुतीची सत्ता आली तरीही संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात कित्येक कोटींची विकासकामे केली आहेत. तरीही मतदारसंघातील मतदारांनी संग्राम थोपटे यांना नाकारले.

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटीच्या दरात पन्नास टक्के सवलत, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठांसाठी वयश्री योजना आणि तिर्थदर्शन योजना यासारख्या योजनांमुळे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना फायदा झाला. याशिवाय १५ वर्षांत भोर तालुक्यातील बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न, भोर एसटी डेपो बंद पडण्याच्या मार्गावर असूनही प्रवाशांना सेवा देण्यासाठी न केले प्रयत्न आणि बंद पडलेला राजगड सहकारी साखर कारखानामुळे भोर तालुक्यात नाराजी वाढत गेली. मतदारांनी उघडपणे न बोलता मतांमधून आणि नाराजी व्यक्त केली.

संग्राम थोपटे यांनी मतदारसंघातील मुळशी तालुक्यात सर्वाधिक विकासकामे करूनही त्यांना मुळशी तालुक्यातून अपेक्षीत मतदान झाले नाही. तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी मुळशीकर एकवटले आणि शंकर मांडेकर यांना मताधिक्य दिले. याखेरीज भाजपचे बंडखोर उमेदवार किरण दगडे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या बंडखोरीचा फटकाही संग्राम थोपटे यांना बसला.

पवारांची सोबत निष्ठावंतांना आवडली नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर संग्राम थोपटे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत गेले. वडील अनंतराव थोपटे यांच्या कारकिर्दीत राजकीय शत्रू म्हणून ओळखले जात असलेले शरद पवार यांच्यासोबत जाणे हे काँग्रेसच्या काही निष्ठावंतांना आवडले नाही. याचाही फटका संग्राम थोपटे यांना बसल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय सभांमधून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकांमुळेही मतदारांच्या नाराजीत भर पडली. या सर्व गोष्टींवर आत्मपरीक्षण करून कॉँग्रेसला पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

संग्राम थोपटे यांच्या पराभवाची कारणे

भोर तालुक्यातील बेरोजगारी, प्रवाशांना न मिळणाऱ्या प्रवासी सेवा आणि बंद पडलेला राजगड सहकारी साखर कारखाना यामुळे वाढलेली नाराजी.

जाहीरनाम्यात आणि सभांमधून नवमतदारांबाबत कुठल्याही प्रकारचे भाष्य नाही.

किरण दगडे आणि कुलदीप कोंडे यांची बंडखोरी

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत राहून सुप्रिया सुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

मुळशी तालुक्यातील मतदारांनी तालुक्याची अस्मिता जपली

अजित पवारांवर केलेल्या टिकांमुळे नाराजी वाढत गेली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT