Sharad Pawar News : युगेंद्र पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे चुकीचे नव्हते; शरद पवारांची स्पष्टोक्ती

Politcal News : अजित पवार व युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही. नव्या पिढीने नव्या दमाने कर्तृत्वान पिढी उभी करावी लागणार आहे. भविष्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती विधानसभेच्या निवडणूक रिंगणात युगेंद्र पवार यांना उतरवणे हे चुकीचे नव्हते. या निवडणुकीसाठी कोणाला तरी मैदानात उतरावावेच लागणार होते, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत उमेदवार उभे करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. (Sharad Pawar News)

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पराभवाची कारणेच सांगितली आहेत. मी घरी बसणार नाही. पुढच्या निवडणुकीत अधिक तयारीने लढावे लागणार आहे. आम्हाला येत्या काळात अधिक काम करण्याची गरज आहे. अजित पवार व युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही. नव्या पिढीने नव्या दमाने कर्तृत्वान पिढी उभी करावी लागणार आहे. भविष्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Ausa Assembly 2024 Result: औसाः अभिमन्यू पवारांनी चक्रव्यूह भेदला; दिनकर माने यांचा पराभव

आमच्यातून बाहेर गेलेल्याना या निवडणुकीत चांगले यश मिळाले. अजित पवार यांच्या पक्षाला यश मिळाले. निवडणुकीतील एकंदरीत आकडेवारी पाहता महायुतीमध्ये कसलीच नाराजी असेल असे वाटत नाही. माझ्या निवृत्तीबाबत मी आणि माझे सहकारी बसून निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Latur Assembly 2024 Result: लातूरमध्ये अमित देशमुखांच्या सरंजामी थाटाची 'गढी' उद्ध्वस्त होता होता वाचली

लाडकी बहीण योजनेचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला अशी चर्चा आहे, त्याविषयी शरद पवारांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कार्यकर्त्यांकडून लोकांकडून मी माहिती घेतली त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे कारण आहे अस कळतय. आमचे सरकार आले तर दोन महिन्यात आम्ही महिलांना मिळणारे पैसे थांबवू असा त्यांनी प्रचार केला. पैसे बंद होईल याबद्दलची चिंता ज्या महिलांना होती त्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं.

Sharad Pawar
Maharshtra Assembly Election: धाकधूक वाढली; अंतिम आकडेवारीनुसार राज्यातील 'या' दहा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचे म्हटले होते. यावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे? हे संबंध महाराष्ट्राला माहित असावं.

Sharad Pawar
Ajit Pawar Video : अजितदादांनी फोडले सुनील शेळकेंच्या विजयाचे गुपित, 'तोच फोटो सगळीकडे फिरवला...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com