Sharad Pawar : महायुतीच्या ग्रँड विजयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मी घरी बसणारा...'

Maharashtra election results Sharad Pawar Reaction : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अवघे 10 उमेदवार विजयी झालेत आहेत. या निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. 234 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अवघे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, 'आमची अपेक्षा होती तसा हा निर्णय नाही. शेवटी लोकांनी हा निर्णय दिला आहे. या निकालाचा अभ्यास करून त्याची कारणमीमांसा करू. आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाऊ. काल निकाल लागला आज मी कऱ्हाडमध्ये आहे. एखादा घरी बसला असता मी घरी बसणारा नाही. आमच्या तरुण पिढीला असा निकाल लागेल असं वाटलं नव्हत. त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे.'

Sharad Pawar
Sharad Pawar News : युगेंद्र पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे चुकीचे नव्हते; शरद पवारांची स्पष्टोक्ती

लाडकी बहीण योजनेचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला अशी चर्चा आहे, त्याविषयी शरद पवारांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कार्यकर्त्यांकडून लोकांकडून मी माहिती घेतली त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे कारण आहे अस कळतय. आमचे सरकार आले तर दोन महिन्यात आम्ही महिलांना मिळणारे पैसे थांबवू असा त्यांनी प्रचार केला. पैसे बंद होईल याबद्दलची चिंता ज्या महिलांना होती त्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं.

राष्ट्रवादी कोणाची?

निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचे म्हटले होते. यावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे? हे संबंध महाराष्ट्राला माहित असावं.

Sharad Pawar
Eknath Shinde News : शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढाईत एकनाथ शिंदे कोकणात वरचढ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com