Thackeray Group Sarkarnama
विश्लेषण

Thackeray Group News : बारामतीचा कित्ता खेडमध्ये गिरवला, पुतण्याने आमदार काकाचा गेम केला!

उत्तम कुटे: सरकारनामा

Pune Khed Politics News :

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे बॅक ऑफिस 19 वर्षे सांभाळलेले त्यांचे निवडणूक रणनितीकार पुतणे डॉ. शैलेश मोहिते यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे रविवारी (ता. 21) आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्याचे धक्के हे राष्ट्रवादीला खेडला विधानसभा निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर खेड विधानसभेच्या निवडणुकीत अगोदरच ट्विस्ट आला होता. त्याने आता आणखी एक मोठे वळण डॉ. मोहितेंच्या प्रवेशाने आज घेतले. त्यामुळे खेडला विधानसभेचे समीकरण पुन्हा बदलणार आहे. तर, ठाकरे शिवसेनेला संघटनेसाठी मोठ्या तयारीचा माणूस भेटल्याने त्यांची ताकद तेथे वाढणार आहे. एवढेच नाही तर, महाविकास आघाडीत खेडची जागा ही Uddhav Thackeray शिवसेनेला मिळण्याची आशाही त्यामुळे बळावली आहे.

शैलेश मोहिते यांनी प्रवेशानंतर सरकारनामाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्याला दुजोरा मिळाला आहे. पक्ष सांगेल ते काम करणार, उद्या ते म्हटले लढ, तर लढणार, मग समोर कोण आहे (चुलते आमदार दिलीप मोहिते) हे पाहणार नाही, अशी गर्जना करीत त्यांनी निवडणुकीलाही तयार असल्याचे सूचित केले. त्याचवेळी दिलेला उमेदवार निवडून आणणार असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

दरम्यान, शैलेश मोहितेंचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीला धक्का असून त्यातून आमदार मोहितेंची विधानसभेची वाट बिकट झाल्याचा दावा खेड-आळंदी विधासभा मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे समन्वयक आणि खेड तालुका पंचायतीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी सरकारनामाशी बोलताना केला.यामुळे आमची संघटनात्मक ताकद वाढली आहे, असे ते म्हणाले.त्यांचे तसेच अशोक खांडेभराड यांचेही नाव खेडमधून शिवसेनेकडून चर्चेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शैलेश मोहिते हे आमदार दिलीप मोहिते यांचे सख्खे पुतणे असून गेले तीन वर्षे राजकीय विजनवासात होते. परंतू पुन्हा ते आता राजकारणात सक्रिय झाले आहेत. आमदार मोहितेंच्या पत्नी सुरेखा या अगोदर जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांनंतर 2000 मध्ये ते प्रथम झेडपी झाले. त्या इलेक्शनपासून शैलेश त्यांच्याबरोबर होते.

2019 पर्यंतच्या चारही विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे बॅक ऑफिस सांभाळलेले आहे. म्हणजेच निवडणूक रणनितीकार म्हणून काम केले आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा त्यांना अनुभव आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड आणि लक्षव्दीप निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT