Importance of Tharoor in Congress : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चेत असणारे शशी थरूर केरळच्या तिरुवंतपुरममधून चारवेळा काँग्रेसचे खासदार आहेत. तुम्हा त्यांना एक असा कुशल राजकारणी संबोधू शकता, जो आपल्या राजकीय कौशल्याची झलक दाखवण चांगल्याप्रकारे जाणतो. शिवाय, ते असेही राजकीय नेते आहेत जे आपल्या पक्षाच्याविरोधातही भूमिका मांडू शकतात. खरंतर काँग्रेससाठी शशी थरूर आता अस्वस्थ करणारे वास्तव बनले आहे.
कारण, शशी थरूर यांनी ते सर्वकाही केलं आहे, ज्याची पक्षात परवानगी नाही. त्यांनी केरळच्या एलडीएफ सरकारची प्रशंसा केली आहे, हायकमांडकडून निवडल्या गेलेल्या मल्लिकार्जुन खर्गेंविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे आणि आता ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या केंद्र सरकारच्या यशाचा जागतिक पातळीवर ते प्रचारही करत आहेत.
खरंतर यामुळे काँग्रेसचे काही नेते सोशल मीडियावर उघडपणे शशी थरूर यांच्यावर टीका, टिप्पणीही करत आहेत. तरीही काँग्रेस नेतृत्व शशी थरूर यांच्याबाबत मौन बाळगून आहे. आजही शशी थरूर केरळ आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसला हवे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईचा प्रश्नच येत नाही. विशेषकरून तेव्हा जेव्हा केरळमध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.
शशी थरूर हे काँग्रेसमधील सर्वात महत्त्वकांक्षी चेहरा म्हणून ओळखला जातो. केरळचे स्थानिक नेतृत्व आणि गांधी कुटुंबाच्या समर्थकांना भलेही ते फारसे आवडत नसतील, मात्र ते राज्यातील मध्यवर्गात एक प्रचंड लोकप्रिय चेहरा ठरेल आहेत. त्यांनी सर्व समुदाय आणि जातींचे भक्कम पाठबळ आहे. एवढच नाहीतर महिला वर्गातूनही थरूर यांना समर्थन आहे. त्यामुळेच आता भाजपही थरूर यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अशावेळी काँग्रेसला त्यांच्याविरोधात कोणतही कारवाई करणं, हे पक्षासाठी नुकसानदायी ठरू शकतं.
याशिवाय शशी थरूर केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदासाठी एक प्रभावी चेहराही बनू शकतात. पिनराई विजयन यांच्या दोन कार्यकाळातील सत्ताविरोधी लाट बघता, थरूर यांना या लढाईत आघाडी मिळू शकते, हे काँग्रेस जाणून आहे. केरळमध्ये काँग्रेसचे अनेक मोठे नेते आहेत, मात्र थरूरच असे व्यक्ती आहेत, जे निडणुकीत एक्स फॅक्टर बनू शकतात. याशिवाय अनेकही कारणं आहेत, ज्यामुळे थरूर हे इतर काँग्रेस नेत्यांपेक्षा कायमच वेगळे आणि प्रभावी ठरतात, ज्याची काँग्रेस हायकमांडला कल्पना आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.