Supreme Court Hearing
Supreme Court Hearing Sarkarnama
विश्लेषण

Supreme Court Hearing : शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही : ॲड. अभिषेक मनु संघवींचा युक्तीवाद

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : घटनेतील १० व्या अनुसूचीमध्ये एक अट आहे. त्यानुसार शिंदे गटाला (Eknath shinde) दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावे लागेल. हा एकमेव बचाव आहे. (कलम 4 नुसार). शिंदे गटाचे आमदार दुसरा राजकीय पक्ष काढू शकतात किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात. पण, मूळ पक्षावर दावा करू शकत नाहीत, असा युक्तीवाद शिवसेनेचे (shivsena) वकील अभिषेक मनु संघवी (Abhishek Manu Sanghvi) यांनी केला आहे. (Shinde groups cannot claim on Shiv Sena : Adv. Abhishek Manu Sanghvi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयात आज (ता. २७ सप्टेंबर) सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्याबरोबरच अभिषेक मनु संघवी हे शिवसेनेच्या वतीने बाजू मांडत आहेत. सिंघवी यांनी युक्तीवादात हा मुद्दा उपस्थित केला आहे.

शिंदे गटाचे आमदार दुसरा राजकीय पक्ष काढू शकतात किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात. पण, मूळ पक्षावर दावा करू शकत नाहीत, असा युक्तीवाद अभिषेक मनु संघवी यांनी केल्यानंतर खंडपीठाने त्यांना ‘विलीनीकरण हाच पर्याय आहे का?’ असा सवाल विचारला.

सिंघवी पुढे म्हणाले की, आमदारांच्या निलंबनाबाबतचा निर्णय जोपर्यंत घटनापीठ घेत नाही, घेतला नाहीय. मग हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे कसं पाठवता येईल. आयाराम गयाराम होत असताना शिंदे गट मूळ पक्षावर कसा दावा करू शकतात, असा सवाल संघवी यांनी केला. त्यावर कोर्टाने निवडणूक आयोग हे पक्षाच्या सर्व गोष्टी ठरवत असत, अशी टिप्पणी केली.

त्यावर सिंघवी यांनी बाजू मांडताना निवडणूक आयोगाने त्यांना तुम्ही नेमके होण आहात, असा प्रश्न विचारायला हवा. कारण ते सध्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत नाहीत. त्यांच्यासमोर गेलेला सदस्य खरा नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला तुम्ही कोण विचारावं? असेही सुनावणीत सिंघवी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीने बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना सवाल केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट कोणत्या भूमिकेतून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे गेला. विधीमंडळ पक्षाचा सदस्य की राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून गेले आहेत.

शिंदे गटानं १९ जुलै रोजी निवडणूक आयोगात धाव घेतली. पण, शिंदे गटाकडून त्यापूर्वीच पक्ष सदस्यत्वाचा त्याग करण्यात आला होता. पक्षात नसताना निवडणूक आयोगात जाणं कितपत योग्य? असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता. तसेच, शिंदे गटाला एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावंच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाचा मूळ पक्ष असल्याचा दावा. मात्र पक्षाचं सदस्यत्व आहे की, नाही; हे ठरवणं महत्त्वाचं आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT