Eknath Shinde shiv sena Sarkarnama
विश्लेषण

Shiv Sena: शिवसेनेत संघटनात्मक मोठे बदल; मनसे स्टाईल नेमणुका

Shiv Sena is also now moving in MNS Style: शिवेसेनेत आता विधानसभानिहाय महिला आघाडीचीही विभागसंघटक पदे निर्माण करण्यात आली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत केवळ मनसेमध्येच पदे निर्माण करण्यात आली होती.

Mangesh Mahale

Summary

  1. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत.

  2. पहिल्यांदाच विधानसभा निहाय ३२ प्रभारी विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून महिला आघाडीच्या पदांचीही निर्मिती झाली आहे.

  3. मनसेच्या धर्तीवर हे बदल करत शिवसेनेने संघटना अधिक मजबूत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहे. याच धर्तीवर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मनसे सारखेच संघटनात्मक फेरबदल केले आहेत.

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदल शिवसेनेत केले असल्याचे बोलले जात आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विधानसभा निहाय विभागप्रमुखांची नियुक्ती करत आता शिवसेनेत अधिकाधिक शिवसैनिकांची वर्णी विभागप्रमुखपदी लावण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेच्यावतीने अशाप्रकारे संघटनात्मक पदे निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आता संघटनात्मक बदल करून विभागप्रमुखांची अनेक पदे निर्माण करण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या प्रभारी विभागप्रमुखांची यादी जाहीर केली आहे.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय प्रभारी विभागप्रमुखांची नेमणूक केली आहे. शिवसेनेच्यावतीने ३२ प्रभारी विभागप्रमुखांची विधानसभा निहाय नियुक्ती केली आहे. तीन विधानसभेत प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेनेची दोन शकले होण्यापूर्वी लोकसभा निहाय एक विभागप्रमुख पद असतानाच त्यात बदल करून लोकसभानिहाय दोन विभागप्रमुखांची नियुक्ती करण्याचा संघटनात्मक पदांमध्ये बदल करण्यात आला. परंतु आता त्यातही बदल करून मनसे प्रमाणेच विधानसभा क्षेत्र निहाय विभागप्रमुख नेमण्याची परंपरा आता सुरु झाली आहे.

शिवेसेनेत आता विधानसभानिहाय महिला आघाडीचीही विभागसंघटक पदे निर्माण करण्यात आली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत केवळ मनसेमध्येच पदे निर्माण करण्यात आली होती आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात ही संघटना अधिक मजबूत झाली होती.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता संघटनात्मक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे सेनेत पूर्वी संघटनात्मक पदे निर्माण करून त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या जात आहे. त्यानुसार लोकसभा निहाय असलेल्या एकल विभागप्रमुख पदाचे दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली.

सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी तीन विधानसभा क्षेत्रासाठी एक विभागप्रमुख नेमण्याची प्रथा उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आल्यानंतर मागील काही वर्षांपासून सुरु झाती आहे. त्यानुसार एका लोकसभा क्षेत्रसाठी दोन विभागप्रमुखांची निवड केली जात आहे. त्याखालोखाल विधानसभा निहाय उपविभागप्रमुख आणि विधानसभा संघटक अशी पदे निर्माण केली आहे.

विविध विभागांमधून सादर करण्यात आलेल्या अहवालांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. या विभागीय अहवाल सादर झाल्यानंतर शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. प्रत्येक विभागात पक्षाची सद्यस्थिती काय, त्यात किती रिक्त पदे आहेत, यावरही चर्चा केली. ही सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यानुसार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कशासाठी बदल

विधानसभा क्षेत्रनिहाय विभागप्रमुख असल्याने पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक अधिक विधानसभेतील शाखांना तथा कार्यालयांमध्ये भेटी देऊन तेथील प्रत्येक शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक, उपविभागप्रमुख, महिला उपविभाग संघटक, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधता येतो आणि यामाध्यमातून पक्ष अधिक संघटनात्मक मजबूत होतो. त्यामुळे शिवसेनेने आता मनसे स्टाईल संघटनात्मक बदल केल्ल्यानंतर याचा फायदा पक्षाला होतो का नाही हे आता येत्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

FAQs

Q1. शिवसेनेत कोणते नवे संघटनात्मक बदल झाले आहेत?
शिवसेनेने विधानसभा निहाय प्रभारी विभागप्रमुखांची ३२ पदे निर्माण करून नियुक्त्या केल्या आहेत.

Q2. हे बदल का करण्यात आले आहेत?
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी हे बदल करण्यात आले.

Q3. या बदलांमध्ये काय नवे आहे?
पहिल्यांदाच महिला आघाडीची विधानसभा निहाय विभागसंघटक पदे निर्माण करण्यात आली आहेत.

Q4. हे बदल कोणाच्या धर्तीवर केले गेले आहेत?
हे बदल मनसेच्या संघटनात्मक रचनेच्या धर्तीवर केले गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT