Prakash Ambedkar, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Prakash Ambedkar News : '...म्हणून ठाकरेंनी कोणाकडे बोट दाखवू नये!' प्रकाश आंबेडकरांने सुनावले

Political News : सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दौऱ्यावेळी शिवसैनिक व भाजपचे (Bjp) कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. त्यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या दौऱ्याला सॊमावरी भाजपकडून विरोध करण्यात आला. रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते अचानक आमनेसामने आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यासोबतच दिशा सालीयनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.

आक्रमक झालेल्या दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावरून आदित्य ठाकरे यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आहे. त्यासाठी मी पोलिसांना दोष देत नाही. त्यांना कुणीतरी आदेश दिला असेल, असे वक्तव्य केले. यानंतर या सर्व प्रकारावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली आहे.

या बाबत नाशिक येथे पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात पण लाठीचार्ज झाला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात पण लाठीचार्ज होत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी कोणाकडे बोट दाखवू नये. इतरांवर एक बोट करत असताना आपल्याकडे चार बोटं असतात, अशी टीका आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

भुजबळांना दिली खुली ऑफर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हेच १०० टक्के ओबीसी नेते आहेत. त्यांच्या पक्षात ओबीसींवर बोलले जाते का? याबाबत त्यांनी सांगावं, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आमच्या सोबत यावं, त्यांना मी खुली ऑफर देत आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारकडून मोठा भ्रष्टाचार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा दुर्दैवाने कोसळला आहे. हे सरकार भ्रष्टाचाराचे माहेर घर आहे. रस्ते, उड्डाण पूल यात मोठे भ्रष्टाचार झाले असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT