MVA News : 'मविआ'त जागावाटपावरून मतभेद; काही मतदारसंघावरून होणार वाद, 'या' बड्या नेत्याने दिली कबुली

Political News : राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार संघर्ष होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होऊ शकतात. निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केले नसले, तरी येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार संघर्ष होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात मविआत जागा वाटपावरुन खटके उडण्याची दाट शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआत काय-काय घडामोडी घडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (MVA News)

राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे काही वाद होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणे, त्याबद्दल वाद होणार नाही, असे होणार नाही. पण शेवटी आम्हाला एकत्र राहायचे आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू, असे यावेळी जयंत पाटील म्हणाले.

त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वेगळा दावा केला आहे. मुंबईतील 99 टक्के जागांवर मविआची सहमती झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे या जागावाटपाच्या चर्चेत नेमके काय घडले ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Bhandara Assembly Election: भंडारा जिल्ह्यातील लढतीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस ?

'99 टक्के जागांवर मविआची सहमती'

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईतील 99 टक्के जागांवर मविआची सहमती झाली आहे. मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन थोडा वाद होणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
MVA News : मविआत तिढा, नवाब मलिकांच्या विरोधात कोण उमेदवार असणार? ठाकरे गटाची मोठा मतदारसंघ सोडण्याची तयारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com