Ravindra Chavan On Eknath Shine sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde Politics : रवींद्र चव्हाण, कपिल पाटलांच्या विरोधात एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी; बविआ, कथोरें भक्कम साथ!

Thane DCC Bank Election Kapil Patil-Ravindra Chavan : जिल्हा बँकेची निवडणूक सुरू होण्यापूर्वीच ही केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया राहिली नव्हती. ती महायुतीतील नेतृत्वाची ताकद आजमावण्याची लढाई झाली होती.

Roshan More

हेमलता वाडकर

Thane News : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल हा केवळ सहकार क्षेत्राचा निकाल म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. या निकालाने ठाणे-पालघरच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट, बहुजन विकास आघाडी आणि भाजप आमदार किसन कथोरे यांची वाढलेली जवळीक नव्या समीकरणांची नांदी दिसत आहे. ही मोट अधिक भक्कम झाल्यामुळे पहिल्यांदाच संचालकपदासाठी सहकार पॅनेलला एकहाती बहुमत मिळाले आहे. किंबहुना पहिल्यांदाच 'सहकार'च्या शिट्टीतून शिवसेनेचा आवाज घुमला आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक सुरू होण्यापूर्वीच ही केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया राहिली नव्हती. ती महायुतीतील नेतृत्वाची ताकद आजमावण्याची लढाई झाली होती. एका बाजूला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनेल उभे केले, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळावर आमदार किसन कथोरे यांनी बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोबत घेत सर्वपक्षीय सहकार पॅनेल उभे केले.

कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यातील सर्वश्रुत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने मात्र जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत शिरकाव केला आहे.

महायुतीच्या नेतृत्वाची पुनर्मांडणी?

जिल्हा बँकेच्या निकालानंतर आता ठाणे-पालघरच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महायुतीतील स्थानिक नेतृत्वाची पुनर्मांडणी होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राजकीय वजन निर्माण करण्याचा कपिल पाटील यांचा प्रयत्न फसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भक्कम साथ असतानाही त्यांच्या पॅनेलला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

कोण कोणाच्या संपर्कात हे स्पष्ट -खासदार शिंदे

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला मिळालेला विजय केलेल्या कामाची पावती आहे. या निवडणुकीत कोण कोणावर प्रभाव टाकत होते यापेक्षा कोण कोणाच्या संपर्कात होते, हेच स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT