Yashwantrao Chavan Sarkarnama
विश्लेषण

यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असतानाही लष्करावर कोसळलं होतं आभाळ

बिपीन रावत यांचा आज हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह पत्नी मधुलिका (Madhulika Rawat) व अन्य 12 जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. भारतीय लष्कराच्या (Indian Army) इतिहासातील हा सर्वात मोठा हेलिकॉप्टर अपघात (Helicopter Crash) असल्याचे बोलले जात आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरचे अपघात यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने देशात खळबळ उडाली आहे.

देशात यापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातांपैकी 1963 मध्ये झालेला अपघातही भीषण होता. यामध्ये लष्कराच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर या अधिकाऱ्यांना घेऊन पुंछच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुंछ नदीजवळ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.

वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल दौलत सिंग, वेस्टर्न कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाईस मार्शल ई. डब्ल्यू. पिंटो, 15 कॉर्पसचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल बिकाराम सिंग, 25 इन्फंट्री डिव्हीजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल के. एन. डी. नानावटी, 93 इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर एस. आर. ओबेरॉय आणि फ्लाईट लेफ्टनंट एस. एस. सोधी यांचा या अपघातात मृत्यू झाला होता.

या भीषण अपघातानंतर देश हादरून गेला होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) हे संरक्षणमंत्री होते. अपघाताचा मुद्दा ससंदेतही उचलण्यात आला होता. चव्हाण यांनी या अपघातातबाबत संसदेत माहिती दिली होती. या अपघाताची चौकशी तत्कालीन एअर व्हाईस मार्शल रामास्वामी राजाराम यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली होती. अपघातानंतर 1980 मध्ये सहा अधिकाऱ्यांचे स्मरण म्हणून स्मृतीस्तंभ उभारण्यात आला. तसेच दौलत सिंग, बिकाराम सिंग आणि पिंटो यांना मृत्यूनंतर परम विशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आलं.

बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टरला झालेला त्यानंतरचा सर्वात भीषण अपघात ठरला आहे. 1963 नंतर पहिल्यांदाच लष्कराच्या सर्वात महत्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. देशाचे पहिले सीडीएस रावत यांचा मृत्यू अपघातात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लष्कराच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा घातपात असू शकतो, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT