Ajit Pawar-Uddhav Thackeray
Ajit Pawar-Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar Interview ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते : अजित पवारांनी केला दावा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना सर्व पक्षातील नेत्यांनी ज्या जबाबदारीने आमदार संभाळण्याचे काम केले. तसेच, काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या वेळी महाआघाडीतील नेत्यांनी आमदार सांभाळले असते तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (...then Uddhav Thackeray would have been Chief Minister today : Ajit Pawar claimed)

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सर्व पक्षातील नेत्यांनी आपापले आमदार सांभाळले होते. सर्वजण अलर्ट होते. खुद्द एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्याचे काम केले.

महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी सरकार स्थापन करताना ज्या जबाबदारींने आमदार सांभाळण्याचे काम केले होते. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदारांना सांभाळले असते, तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, असेही अजित पवार यांनी नमूद केले. पहाटेच्या शपथविधीवर मला बोलायचे नाही. पण त्या शपथविधीनंतरही राष्ट्रवादीमधील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद देण्याची विनंती केली. त्यानुसार पक्षाने मला उपमुख्यमंत्रीपद दिले, असेही पवार म्हणाले.

ते म्हणाले की, भाजपबरोबरच जाण्यासाठी राष्ट्रवादीत कोणताही दबाव गट नाही. आपण आतापर्यंत धर्मनिरक्षेप, पुरोगामी महाराष्ट्र बोलत आलो. महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर त्या गोष्टी जरा बाजूला पडल्या. हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाकरे कायम राहिले आहेत. पण, मतभिन्नता निर्माण करणारे प्रश्न निर्माण करायचे नाहीत, असं ठरलं. शेवटच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, धाराशिवचा निर्णय घ्यायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले. त्याला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. पण अंमलबजावणी होत असतानाच सरकार गडगडले. पण पुढच्या सरकारने केंद्राच्या मदतीने तो निर्णय घेतला.

उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व कार्यकर्ते एकजूठ करण्यासाठी सर्व विभागात सभा घेण्याचे ठरले हेाते. त्यानंतर कोरोना, उद्धव ठाकरे यांचे आजारपण यामुळे वेळ गेला. आता आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात संभाजीनगर, नागपूरला सभा झाली आहे. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार आम्ही चालत आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT