Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

BJP News : कर्नाटक हातचे जाताच भाजपा हादरला; पक्षसंघटनेत हे बदल तातडीने होणार; शिंदे गटाचे वजन वाढणार...

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Assembly Result News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दणदणीत विजय झाला. तर भाजपला अवघ्या 65 जागा मिळाल्या. त्यामुळे आता भाजपमध्ये केंद्रीय पातळीवर लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा आहे. तसचे केंद्रीय मंत्रीमंडळातही मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कर्नाटकमध्ये (Karnataka) स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रचार केला होता. मात्र, तरीही पक्षाला यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपाला आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची चिंता लागली आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करु शकतात.

मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी भाजपाने (BJP) मोठी तयारी केली होती. मात्र, कर्नाटकमध्ये झालेल्या पराभवामुळे पक्षात नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपामध्ये लवकर मोठे बदल दिसू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. पीएमओने सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. यामध्ये महाराष्ट्रातूनही शिवसेना (शिंदे गट) मंत्रिपद मिळू शकते.

महाराष्ट्र 48 , बिहार 40, पश्चिम बंगाल 42, कर्नाटक 28, पंजाब 13 या राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या 171 जागा आहेत. तामिळनाडू 39, तेलंगणा 17, आंध्र प्रदेश 25 आणि केरळमध्ये 20 या राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 101 जागा आहेत, त्यामध्ये भाजप यश मिळवता आलेले नाही. त्यातच आता लोकसभेच्या 28 जागा आहेत तेही राज्य आता भाजपच्या हातातून गेले आहे.

लॉकेट चॅटर्जी आणि दिलीप घोष यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. तसेच महाराष्ट्राचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि यांनाही बदलण्याची चर्चा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांची संपूर्ण टीमही 2024 पर्यंत राहिल असे सांगितले जात होते. मात्र, कर्नाटकच्या पराभवानंतर बदल होण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.

नड्डा यांचे राज्य असलेल्या हिमाचलमध्ये पराभव झाला. तसेच संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या राज्य असलेल्या कर्नाटकमध्येही भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम चेहरे आवश्यक वाटू लागले आहे. त्यामुळे काही केंद्रीय मंत्र्यांवर पक्षकार्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा भाजपामध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT