Uddhav Thackeray-Mehbooba Mufti Sarkarnama
विश्लेषण

Opposition Unity Meeting : पाटण्यातील विरोधकांच्या ऐकीच्या बैठकीने उद्धव ठाकरेंची केली कोंडी

एरव्ही पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केल्यामुळे भाजपवर तुटून पडणारे ठाकरे यांना बचावात्मक भूमिका घेण्याची गरज भासू शकते.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केल्याने भाजपवर नेहमीच आगपाखड करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांची आज पाटण्यातील विरोधकांच्या ऐकीच्या बैठकीतच कोंडी झाली. खुद्द मेहबुबा मुफ्ती यांच्याशेजारीच ठाकरे यांना बसावे लागले, त्यावरून इकडे महाराष्ट्रात भाजपने ठाकरेंविरेाधात रान उठवले आहे. (Uddhav Thackeray got into a dilemma with the unity meeting of the opposition)

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील जवळपासू १५ पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते आज पाटण्यात एकत्र आले होते. या बैठकीला अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, ममता बॅनर्जी, भगवंत मान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, लालूप्रसाद यादव, ओमर अब्दुल्ला, महेबुबा मुफ्ती, हेमंत सोरेन व इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूलाच महेबुबा मुफ्ती बसल्या होत्या. तसेच, दुपारनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही मुफ्ती यांच्याशेजारीच उद्धव ठाकरे होते. वास्तविक हे खुर्च्याचे आणि बसण्याचे नियोजन आयोजकांनी केलेले असते. त्यानुसार संबंधित व्यक्तीला बसावे लागते. त्यानुसार ठाकरे आणि मुफ्ती शेजारी शेजारी आले असावेत. मात्र, त्याविरोधात भाजपने रान पेटवले आहे. त्याला कारणही तसेच आहे.

एरव्ही पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केल्यामुळे भाजपवर तुटून पडणारे ठाकरे यांना बचावात्मक भूमिका घेण्याची गरज भासू शकते. एक मात्र खरं की विरोधी ऐक्याच्या बैठकीने उद्धव ठाकरेंची यांची पुरती कोंडी करून टाकली आहे. भाजपकडून होणाऱ्या टीकेला शिवसेनेकडून कशा पद्धतीने उत्तर दिले जाते, हे पहावे लागेल.

आम्हाला टोमणे मारणारे ठाकरे मुफ्तींशेजारी बसले : फडणवीस

मेहबुबा मुफ्तीच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मुफ्ती यांच्यासोबत चालले आहेतच. पण ते, आज त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. सत्तेसाठी आणि परिवारवादी पार्टी वाचविण्यासाठी सगळ्या प्रकारचे समझोते करण्यासाठी हे तयार आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

याच्यासारखं दुर्दैवं नाही : दरेकर

उद्धव ठाकरे हे आंधळेपणाने राजकारण करताना दिसत आहेत. मुफ्तीच्या काळात पाकिस्तानचे झेंडे जम्मू काश्मीरमध्ये फडकले होते. पण आम्ही त्यासोबतची युती तोडून सरकारमधून बाहेर पडलो होतो. आता मुफ्ती यांच्या मांडीला मांडी लावून बसणं, याच्यासारखं दुर्दैवं नाही, अशी टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT