Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance news Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधुंच्या युतीचं भाजपला टेन्शन; BMC जिंकण्याच्या भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लागणार?

Alliance between Raj Thackeray and Uddhav Thackeray could change the political landscape in bmc elections: वीस वर्षापासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यांचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले आहेत. ठाकरे बँडसाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले, असे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

सरकारनामा ब्यूरो

MNS And Thackeray Shivsena Alliance News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधु एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज ठाकरे हे परदेशात गेले आहे. तर उद्धव ठाकरे हेही परदेशात रवाना होत आहे. दोन्ही भावामध्ये युती होणार की नाही, ते परदेशातून परत आल्यानंतर समजेल, पण या युतीमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचे दिसते.

ठाकरे बंधुंची युती सत्तेच्या सारीपाटावर वजीराच्या भूमिकेसारखी असू शकते. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या युतीबाबतचा प्रश्न विचारलेले आवडलेले नाही. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे परममित्र असल्याचा दावा करीत असलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांच्यासोबतची मैत्री तुटल्याचे जाहीर केले.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधुंची युती झाली तर भाजपला आणखी जोर लावला लागेल. ठाकरे बंधुंच्या युतीची भाजपला भीती आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या हालचाली ठाकरे बंधुंमध्ये सुरु आहे. वीस वर्षापासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यांचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले आहेत. ठाकरे ब्रँड साठी ठाकरे बंधू मैदानात उतरले, असे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण नुकत्यात झालेल्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधुंची धुळधाण झाली. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह गेले, तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला.

काय फायदा होईल?

आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधु एकत्र येत असल्याची बोलले जाते. मराठी माणसाला एक संयुक्त व्यासपीठ मिळेल, मराठी अस्मितेचा कमकुवत झालेला मुद्दा पुन्हा बळकट होईल, युतीचा दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा मिळेल, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरे सेनेला मदत होईल, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरी भागात युतीचा चांगला परिणाम होईल.

काय आहेत आवाहने?

  1. युतीचं नेतृत्व कोण करणार

  2. आघाडीतून ठाकरे बाहेर पडून राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे युती करणार का?

  3. महाविकास आघाडीत समन्वय कसा साधणार

  4. राज ठाकरे यांचे कट्टर प्रादेशिक अस्मितेचं अस्तित्व कसं स्वीकारणार

  5. मराठी मतांनुसार दोन्ही पक्ष मतदारसंघाची कशी विभागणी करणार

  6. यापूर्वी विरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांना कसे एकत्र आणणार

  7. अमित आणि आदित्य एकमेकांचं नेतृत्व कसं स्वीकारणार

भाजप सोबत न जाण्याचे परिणाम उद्धव ठाकरे यांना सहन करावे लागले आहेत तर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना झुलवत ठेवल्याचे दिसले. भारत जिंकण्यासाठी निघालेल्या भाजपच्या स्वप्नाला स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधु सुरुंग लावून यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT