Indira Gandhi diplomacy : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान स्थित दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात एकप्रकारे युद्ध सुरू केलं आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय लष्काराकडून संयमानं उत्तर दिलं जात आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर झालेल्यी शस्त्रसंधीचं देखील पाकिस्ताननं उल्लंघन केलं आहे.
पाकिस्तान त्याच्या कुरापाती थांबवायला तयार नाही. अशातच पाकिस्तानला चीन अन् अमेरिकेचा उघड पाठिंबा दिला आहे. तुर्की देखील पाकिस्तानच्या मदतीला धावून आला आहे. आताचा बांग्लादेश पूर्वीचा पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी 1971 मध्ये, म्हणजे 54 वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान युद्धावेळी देखील चीन अन् अमेरिकेनं पाकिस्तानला बळ दिलं होतं. इंदिरा गांधींच्या मुत्सद्देगिरीपुढं हे दोन्ही देश तोंडघशी पडले अन् बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळाले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी (terrorist) हल्ल्याला भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. यानंतर भारत-पाकिस्तान देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. भारताने देखील जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरवले. दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची शनिवारी घोषणा झाली. तशी शस्त्रसंधी झाली. परंतु पाकिस्तानने त्याचं उल्लंघन केले. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये तोडगा काढण्याऐवजी चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला. अमेरिकेनं देखील पाकिस्तानची बाजू घेतली. तुर्की युद्धसामुग्री घेऊन पाकिस्तानच्या बंदरावर दाखल झालं.
भारताविरोधात (India) पाकिस्ताने एकप्रकारे युद्धचं पुकारलं होतं. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत निष्फळ ठरवलं. परंतु अशा युद्ध परिस्थितीमध्ये अमेरिका, चीन देशाची भूमिका भारतविरोधी राहिल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. बांग्लादेश स्वातंत्र्यासाठी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात देखील चीन आणि अमेरिकेने पाकिस्तानला बळ दिलं होतं. आज भारत पुन्हा दहशतवादाविरोधात लढताना, अमेरिका आणि चीनने, बांग्लादेश स्वातंत्र्य युद्धाचा कित्ता तब्बल 54 वर्षांनी पुन्हा गिरवला.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 27 मार्च 1971 मध्ये राज्यसभेत पूर्व पाकिस्तानमधील अत्याचारांची माहिती दिली. 31 मार्चला त्यांनी पूर्व पाकिस्तानातील जनतेच्या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी लष्करप्रमुख सॅम बहादूर होते. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरोधात कारवाई करावी, अशी भूमिका मांडली. इंदिरा गांधींचा विचार धाडसी होता. काळ शीतयुद्धाचा होता. अमेरिका आणि चीन हे दोन बडे देश भारताच्या विरोधात होते. पाकिस्तानशी युद्ध म्हणजे, सरळ-सरळ अमेरिकेला आव्हान देण्यासारखे होते. अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन, परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर पाकिस्तानच्या बाजूने उभे होते.
रिचर्ड निक्सन यांना इंदिरा गांधी आणि भारतीयांविषयी प्रचंड द्वेष होता. त्याचा संदर्भ 2005 मध्ये अमेरिकेने डाॅक्युमेन्ट्स आॅन साऊथ एशिया 1969-1972 या शीर्षकाखालील गोपनीय कागदपत्रे खुली केली. त्यातील एका संभाषणातून ते स्पष्ट होते. या संभाषणातून त्यावेळचा पाकिस्तानचा लष्करप्रमुख याह्या खान अमेरिकेचा किती लाडका होता, हे कळते. कारण चीन आणि अमेरिकामध्ये तो मध्यस्थीची भूमिका बजावत होता. असे असतानाही इंदिरा गांधी यांनी मनोमन पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय लष्कारानं 1971 चं युद्ध जिकलं, आणि पाकिस्तानमधून पुढं बांग्लादेशाची निर्मिती झाली. पाकिस्तानबरोबरच हा धडा, अमेरिका आणि चीनला देखील भारताच्या मुत्सद्देगिरीपुढं ओळख करून देणारा ठरला.
यातून इंदिरा गांधी यांची मुत्सद्देगिरी दिसत असली, तरी अमेरिका आणि चीन या बलाढ्य देशानं त्यावेळी आणि आता देखील पाकिस्तानची बाजू घेतल्याचं उघडं दिसतं. अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर देखील अवघ्या तीन तासांत पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. सुरुवातीला भारताच्या बाजूने असलेली अमेरिका पुढील 24 तासांत भारत-पाकिस्तानच्या या वादात आम्ही पडणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या दबावानंतर अमेरिकेने मध्यस्थीची तयारी दर्शवली. चीनने तर पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला.
पाकिस्तानची दोन बलाढ्य देश तळी उचलून असले, तरी रशिया आणि जपानने भारताला पाठिंबा दिला आहे. आतंरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाविरोधाच्या या लढ्याला भारताला मोठा पाठिंबा मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कार्यपद्धतीवरून चांगलाच दबदबा निर्माण केल्याचं समोर आलं आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात पाकिस्तानला भारतानं चांगलच जेरीस आणलं, त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेसमोर वारंवार हात पसरावे लागल्याचं दिसतं.
आतंरराष्ट्रीय नाणेविधी संघटनेने कंगाल पाकिस्तानला एक अब्ज कोटी कर्ज मंजूर केलं आहे. यावरून भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर नाराजी व्यक्त केली आहे. यातच शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारताने UN कडे मुद्दा उपस्थित करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी भक्कम पुरावे उभं केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी झाली असताना, देखील अमेरिका आणि चीन हे बलाढ्य देश पाकिस्तानाच्या कुरापतींवर पांघरूण घालण्याचा प्रयत्नात दिसतात. भारताच्या परराष्ट्र धोरणानं दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानबरोबरच त्याच्या मित्रदेश अमेरिका आणि चीनची कोंडी होताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.