Dawood Ibrahim Masood Azhar extradition : दाऊद इब्राहिम, मसूद अझहर याला पाकिस्तानच्या ताब्यातून घेण्याची हीच वेळ...

Shivsena Minister Sanjay Rathod Demands Modi Govt to Bring Dawood Ibrahim and Masood Azhar from Pakistan : यवतमाळ मधील शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानमधून दाऊद इब्राहिम आणि मसूद अझहर याला ताब्यात घेण्याची मागणी केली.
Dawood Ibrahim Masood Azhar
Dawood Ibrahim Masood Azhar Sarkarnama
Published on
Updated on

Modi government on Dawood Masood : जम्मू-काश्मीर इथं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने एअर स्ट्राइक करत ऑपरेशन सिंदूर राबवून जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानस्थित नऊ दहशतवादी तळ भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केली.

भारत-पाकिस्तान दोन्ही देश समोरा-समोर आली आहेत. चार दिवसांपासून पाकिस्तान एकप्रकारे भारताविरुद्ध युद्धच छेडलं आहे. शस्त्रसंधी होऊन देखील त्याचं पाकिस्ताननं उल्लंघन केलं. भारतानं चहूबाजूने पाकिस्तानची कोंडी केली आहे. यवतमाळमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आता मोठी मागणी केली आहे.

भारताकडून (India) पाकिस्तानबरोबर चर्चा करत असताना, शिवसेनेच्या चार प्रमुख मागण्या ठेवूनच चर्चा करा, अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी केले. पाकव्याप्त काश्मीर हे भारताच्या ताब्यात द्यावे. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि मसूद अझहर याला ताब्यात द्यावे, या प्रमुख दोन मागण्या ठेवूनच चर्चा करावी.

Dawood Ibrahim Masood Azhar
India Pakistan Partition Army division : फाळणीवेळी पाकिस्तानला किती सैन्य मिळाले...

तसेच भारताविरुद्ध दहशतवादी (Terrorist) कारवाई झाल्यास, ते युद्ध म्हणून समजले जाईल, त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा द्यावी. पाकिस्तानने दहशतवादी कारवाई बंद कराव्यात, दहशतवाद्यांना थारा देऊ नये, अशा मागण्या ठेवूनच पाकिस्तानशी चर्चा करावी, असे शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

Dawood Ibrahim Masood Azhar
Pakistan ceasefire violation : शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुठं तक्रार होऊ शकते...

भारतीय लष्कराच्या समर्थनात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. पण ही तिरंगा रॅली रद्द करण्यात आली. भारतीय लष्कराला समर्थन देताना, माजी सैनिकांचा सत्कार करत सभा घेण्यात आली. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सभा घेण्यात आली. भारत माता की जय, अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने महाराष्ट्रात जागोजागी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलींना स्थगिती देण्यात आली आहे. भाजप महायुती मित्रपक्षांनी ही रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेसने देखील जय हिंद यात्रेचे आयोजन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com