Indapur Bazar Samiti Result
Indapur Bazar Samiti Result Sarkarnama
विश्लेषण

Bazar Samiti Result : राष्ट्रवादीशी युती करायला इंदापुरात काय अडचण होती? : छुपा विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील : जगदाळेंचा रोख कुणाकडे

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : महाराष्ट्रात सहकार निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रत्येकाची कुठे ना कुठे युती झाली. मग, इंदापुरातच काय अडचण होती, असा टोला इंदापूर (Indapur) बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब जगदाळे यांनी भाजप (BJP) आणि त्यांच्या नेत्यांना नाव न घेता लगावला. (What was the problem in Indapur to form alliance with NCP: Balasaheb Jagdale)

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आ.दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेल्या पॅनलच्या सत्कार समारंभाप्रसंगी आ.भरणे बोलत होते. यावेळी मोहोळचे आ.यशवंत माने, पॅनल प्रमुख भाऊसाहेब सपकळ, प्रचार प्रमुख कांतीलाल झगडे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते म्हणाले की, सोसायटी तसेच ग्रामपंचायत मतदारांचे सर्व विजय उमेदवारांच्या वतीने आभार मानतो. तसेच खऱ्या अर्थाने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचेही आभार मानतो.

अजित पवारांनी निरोप दिला इंदापूर बाजार समिती बिनविरोध झाली पाहिजे. आमचं प्रत्यक्ष बोलणं झालं नव्हतं. मात्र निरोप आला आणि बँकेच्या निवडणुकीत सर्व पॅनेल तयार असतानाही काम चांगला असल्याने मला बिनविरोध काम करण्याची संधी दिली. याची जाण ठेवत आम्ही पुढे आलो. मात्र, काहीजण म्हणतात आम्हाला विचारले नाही. याचाही त्यांनी समाचार घेत मागील पाच वर्षात आमचं काम चांगलं होतं. यावर तुम्ही स्वतः पुढे येऊन का चर्चा केले नाही, असाही सवालही त्यांनी उपस्थित केला.

जगदाळे म्हणाले की, विरोधात गेलेली मते विचारात घेता विरोध करायचा असेल तर समोरासमोर येऊन विरोध करा. पाठिमागून येऊन विरोध केल्यास केल्यास भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती भविष्यात राज्यामध्ये पहिल्या पाच क्रमांका मध्ये येण्यासाठी प्रयत्न करू आणि तालुक्याचा आमदार या नात्याने यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल. आप्पासाहेब जगदाळे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या चांगल्या कामामुळे मतदारांनी पुन्हा संधी दिली असल्याचे माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

या वेळी मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू अशी ग्वाही देत सर्व मतदारांचे आभार मानले. विजय उत्सव साजरा करताना मतमोजणी केंद्रापासून जुन्या बाजार समितीच्या प्रांगणापर्यंत वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयी सभा घेण्यात आली. या वेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT