Winter Session 2023 Sarkarnama
विश्लेषण

Winter Session 2023 : तुमचे खासदार कमळ चिन्हावर लढणार का ? उत्तर देतांना नेत्यांच्या तोंडाला फेस..

Jagdish Pansare

Nagpur Assembly Session : नागपूर हिवाळी अधिवशेनात सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार, मंत्री, नेते यांच्यावर माध्यमांचा सर्वाधिक फोकस होता. या काळात काही खासदारांनीही विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली. (Winter Session 2023) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील विधीमंडळ परिसरात दिसले.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) सर्व खासदार हे भाजपच्या (BJP) कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची बातमी सुत्रांनूसार समोर आली. मग काय माध्यमांनी याच मुद्यावर शिंदे गटाच्या मंत्री, आमदार, नेत्यांना हे खरं आहे का? असे विचारायला सुरूवात केली. इतरवेळी माध्यमांसमोर जाण्यास इच्छूक असणाऱ्या अनेक नेत्यांच्या तोंडाला या प्रश्नाचे उत्तर देतांना फेस आला.

शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यात आघाडीवर होते. विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या आमदार अपात्रेच्या सुनावणीचा विषय असो, की मग ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर असो, शिरसाट मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वाने माध्यमांना सामोरे जात होते. (Maharashtra) तुमचे खासदार कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत का ? या प्रश्नावर मात्र तुम्ही अशा सुत्रांनूसार चुकीच्या बातम्या चालवत जाऊ नका, आम्ही लोकसभेची निवडणूक धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढवणार, असे शिरसाट सांगत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाकडून सोडण्यात आलेलीही पुडी असल्याचेही ते सांगायचे. लोकसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. मात्र अद्यापही शिंदेंच्या १३ खासदारांना उमेदवारी मिळणार का? याचे उत्तर ठामपणे ना मुख्यमंत्री शिंदे देत आहेत, ना त्यांच्या पक्षाचे इतर नेते. अधिवेशन काळातही याच प्रश्नाने शिंदे गटाला भांडावून सोडल्याचे दिसून आले.

विधीमंडळ परिसरात शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचा आमना-सामनाही झाला. संजय शिरसाट- अंबादास दानवे, सुनील प्रभू-प्रताप सरनाईक, अनिल परब- नवाब मलिक हे नेते एकमेकांच्या समोर आले, बोलले आणि निघून गेले. हे चित्र आपल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यासाठी माध्यमांमध्ये मोठी स्पर्धाही लागली होती.

त्यानंतर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सामुहिक फोटो काढतांनाही नाईलाजाने का होईना शिंदे, ठाकरे, शरद पवार, अजित पवार गटाच्या आमदार, मंत्र्यांना एकत्र यावे लागले होते. त्यानंतरही माध्यमांशी बोलतांना सुनील प्रभू- संजय शिरसाट यांनी हा एक ऐतिहासिक क्षण असून आमची नैतिकतेची लढाई असल्याचे सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT