Winter Session 2023 : अधिवेशनाचे दोन आठवडे दाऊद, इक्बाल मिर्ची, सलीम कुत्ता यांनी गाजवले..

Maharashtra News : नागपूरचे अधिवेशन नेहमीच वादळी ठरत आले आहे. यावेळी मात्र अधिवेशनाचे कामकाज थंडावल्याचे दिसून आले.
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Assembly Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील दोन आठवड्याचे कामकाज काल संपले. विधेयके, मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण, जुनी पेन्शन योजना आणि विधीमंडळावर येणाऱ्या विविध, पक्ष, संघटनांच्या काही मोर्चावर झालेला लाठीमार याची चर्चा राज्यभरात झाली. (Winter Session 2023) राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांची विधीमंडळातील हजेरी, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असल्याचे संकेत आणि यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी लिहलेले पत्र, वाद, विरोधकांचे आरोप यामुळे अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली.

Nagpur Winter Session
Nagpur Winter Session : सत्ताधाऱ्यांकडून बेरोजगारांची थट्टा...! विरोधकांकडून पकोडे तळून निषेध

देशद्रोही दाऊद इब्राहीम याच्याशी असलेल्या संबंधामुळे विरोधकांनी महायुती सरकारला घेरण्यासाठी या मुद्द्याचा पुरेपूर वापर केला. (Nagpur) पण हे एवढ्यावरच थांबले नाही तर याची जणू श्रृंखलाच पुढे सुरू झाली. नवाब मलिक यांच्यानंतर ठाकरे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दुसरे नते प्रफुल पटेल यांना घेरत त्यांचा कुख्यात गॅगस्टर इकबाल मिरची याच्याशी संबंध जोडत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

कुरघोडीच्या राजकारणात हिवाळी अधिवेशनाचे दोन आठवडे सरले. (BJP) या दोन आठवड्यात राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, व्यापारी वर्गाचे किती प्रश्न सभागृहात चर्चिले गेले आणि सुटले हा खरा प्रश्न आहे? (Shivsena) दुर्दैवाने हिवाळी अधिवसेनाचे दोन आठवडे गाजवले ते दाऊद, इक्बाल मिर्ची, सलीम कुत्ता यांनीच असे म्हणावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील शेवटच्या दिवसाचे कामकाज काल संपले, तत्पुर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिकचे नेते आणि संजय राऊत यांचे समर्थक सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. एका पार्टीतील छायाचित्र आणि इतर माहितीचा पेनड्राईव्हच राणे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी चौकशीचे आदेशही दिले. या आधा चित्रपट अभिनेत्री दिशा सालियान प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला. यातही नितेश राणे हेच आघाडीवर होते. या प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, की मग एकमेकांवर राजकीय कुरघोडी आणि सूड उगवण्यासाठी असा प्रश्न निश्चितच पडल्याशिवाय राहत नाही.

राज्यात सध्या मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलेले आहे. यावर सभागृहात मॅरेथाॅन चर्चा झाली, सगळ्याच नेत्यांनी आपल्या भावना या विषयावर व्यक्त केल्या. ठोस निर्णय मात्र कुठलाच झाला नाही. जुनी पेन्शन योजना, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न हाती घेत युवा संघर्ष यात्रा काढत त्याचा समारोप नागपूरात केला. यावेळी विधीमंडळावर मोर्चा नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यावर लाठीचार्ज झाला त्यामुळे याचीही चर्चा राज्यात झाली. सरकारने या मोर्चाची फार दखल घेतल्याचे दिसले नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मोर्चासाठी थेट नागपूर गाठले होते, त्यामुळे या मोर्चाबद्दल मोठी उत्सूकता होती.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे झालेले नुकसान, अवकाळी, गारपीटीसाठीची मदत, अनुदान, पीकविमा असे असंख्य विषय सभागृहात आले, त्यावर चर्चा झाल्या, पण प्रत्यक्षात पदरी काहीच पडले नाही. नागपूरचे अधिवेशन नेहमीच वादळी ठरत आले आहे. यावेळी मात्र अधिवेशनाचे कामकाज थंडावल्याचे दिसून आले. राज्यातील महत्वाच्या विषयांना कमी आणि राजकीय कुरघोडीसाठीच्या आरोप-प्रत्यारोपांना अतिमहत्व या दोन आठवड्याच्या कामकाजात दिल्याचे दिसून आले. शेतकरी, बेरोजगारी, शिक्षण, उद्योग, आरोग्य या सर्वसामान्यांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्नांवर दाऊद इब्राहीम, इक्बाल मिरची दिशा सालियन, सलीम कुत्ता यांनी मात केली असेच म्हणावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com