

औरंगाबाद/ वैजापूर : काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे बुधवारी (ता. दोन) सकाळी ६.३० वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर सायंकाळी ४ वाजता दहेगाव (ता. वैजापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची प्रकृती मधुमेहाच्या त्रासामळे काही दिवसांपूर्वी खालावली होती. त्यामुळे त्याना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील दहेगाव येथे १९७० साली सरपंच पदापासून आपल्या राजकरणाचा श्रीगणेशा करणारे रामकृष्ण बाबा यांच्या कारकिर्दीला खरा बहर आला तो १९८५ साली. त्यावर्षी त्यांनी वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले.
हे पद १९९५ पर्यंत त्यांनी कायम ठेवले. याशिवाय १९९९ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर खासदारकी मिळवली. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा त्यांनी पराभव केला होता. रामकृष्ण बाबांनी पंचायत समितीचे सभापती पद, तर २५ वर्ष जिल्हा बैंकेचे चेअरमन म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉप-आप बैंकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही बाबांनी काम केले. सध्या औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अप्पासाहेब पाटील, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील ही दोन मुले आहेत.
Edited By - Amit Golwalkar
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.