काँग्रेसला धक्का; विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशींचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अजून एक धक्का बसला असून विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. रघुवंशी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Congress Council Member Chandrakant Raghuvanshi Resigns
Congress Council Member Chandrakant Raghuvanshi Resigns

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अजून एक धक्का बसला असून विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. रघुवंशी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. नंदुरबार धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हाती रघुवंशी यांनी आपला राजीनामा सोपवला. चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत रघुवंशी काँग्रेसचे विधानपरिषदेचे तीन वेळा आमदार होते. रघुवंशी यांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यांनी १९९२ ते १९९८ असे सहा वर्ष धुळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com