Ketaki Chitale News : ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवले; केतकी चितळेवर गुन्हा

Ketaki Chitale केतकी चितळे व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रार देवून आंबेडकरी चळवळीतील नागरीकांनी केली होती.
Ketaki Chitale
Ketaki Chitalesarkarnama

Beed News : कायमच वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हीला ॲट्रॉसिटी कायद्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य भोवले आहे. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद झाला.

चार दिवसांपूर्वी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद झाली. या परिषदेत अभिनेत्री केतकी चितळेने अॅट्रासिटी कायद्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सोशल मीडियावर आंबेडकरी समाजाने याबाबत संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या होत्या.

केतकी चितळे (Ketki Chitale) व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार देवून मागणी आंबेडकरी चळवळीतील नागरीकांनी केली होती. यानुसार गुरुवारी परळीतील प्रेमनाथ जगतकर यांनी फिर्याद दिली. यावरुन परळी शहर पोलीस ठाण्यात केतकी चितळे व परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ketaki Chitale
Ketaki Chitale news केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी म्हणाले, केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. समाजाच्या व्यासपीठावरून अशी अनेक मत मतांतरे व्यक्त होतात, अशाच प्रकारचे हे वक्तव्य होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही. हे वक्तव्य ठरावाच्या चर्चेत सुद्धा घेतले गेले नाही. ब्राह्मण ऐक्य परिषदेने या वक्तव्याशी सहमती नसल्याचीच भूमिका घेतलेली आहे.

Edited By : Umesh Bambare

Ketaki Chitale
video : कोण ketaki अन् काय तिची लायकी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com