चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजू नका, त्यांनी १०५ आमदार निवडून आणलेत..

चंद्रकांतदादांनी (Chandrakant Patil) (Bjp State President,Maharashtra) राजकारणात केलेले काम आणि पक्षाला मिळवून दिलेले यश विसरता येणार नाही.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkaranama
Published on
Updated on

औरंगाबाद ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची औकात सव्वा रुपयांची आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला सुनावले आहे. चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजू नका, त्यांनी राज्यात भाजपचे १०५ आमदार निवडून आणलेत, असा टोला दानवे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात भाजपने लढवलेल्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या अशा सर्वच निवडणूकीत भाजप नंबर एकचा प्रश्न राहिला आहे, असा दावाही दानवे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या एका जाहीर कार्यक्रमात दानवे यांच्या उपस्थितीतच आजी-माजी आणि एकित्रत आले तर भावी सहकारी अशी साद भाजपला घातली होती.

त्यानंतर राज्यभरात शिवसेना-भाजप पुन्हा युती होणार या चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांनी आपल्या या जुन्या दोस्ताबद्दल गोड बोलणे सुरू केले होते. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. त्यांची औकात सव्वा रुपयांचीच आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजप विरोध कायम असल्याचे दाखवून दिले. यावर रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावला.

प्रसार माध्यमांशी दिल्लीत बोलतांना दानवे यांनी चंद्रकांतदादांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. रावसाहेब दानवे म्हणाले. चंद्रकांतदादा हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच्याबद्दल शिवसेनेने केलेली भाषा ही त्यांची भाषाच आहे. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांतदादांनी राजकारणात केलेले काम आणि पक्षाला मिळवून दिलेले यश विसरता येणार नाही. त्यांच्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपचे १०५ आमदार या राज्यात निवडून आले आहेत, हे शिवसेनेने विसरू नये.

एवढेच नाही तर राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींचे सरंपच, पंचायत समित्या, तिथले सभापती हे सर्वाधिक भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांची क्षमता, शिवसेनेच्या भाषेत सांगायचे तर औकात मोजायची असेल तर ती पैशात मोजून नका, तर राजकारणातील त्यांच्या ताकदीत मोजा, असेही दानवे म्हणाले. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तर कुठल्याही अर्थाने समर्पक नाही.

राज्यपालांचा केंद्राशी काय संबंध?

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे हेच राज्यपालांच्या पत्रावरून सिद्ध होते. यावर चर्चा करून अधिवशेन बोलावण्याची त्यांनी केलेली सूचना सकारात्मक घेण्याऐवजी राज्यपालांनाच उलट पत्र पाठवून तुम्ही केंद्राला अधिवेशन घ्यायला सांगा, असे पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवणे योग्य नाही. राज्यात याआधी देखील अनेकदा राज्यपालांनी राज्य सरकारला पत्र पाठवून वेगवेगळ्या गंभीर विषयांवर अधिवेशन बोलवण्याची सूचना केली आहे.

Raosaheb Danve
मुनगंटिवारांचे खळबळजनक विधान; शिवसेना फिरसे लौट आयेगी

विधानसभा, परिषदेच्या सभागृहात देखील अनेक पक्ष अशी मागणी करत असतात. शिवसेनेने देखील अनेकदा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या पत्राला उलट उत्तर देऊन त्यांना केंद्राला अधिवेशन घेण्याचा सल्ला देणे चुकीचे आहे. राज्यपालांचा केंद्राशी काहीही संबंध नसतो, ते राज्याचे राज्यपाल असतात, ते केंद्राला एखाद्या विषयावर अधिवेशन घ्या, असे सांगू शकत नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com