औरंगाबाद : लोकांच्या आग्रहाखातर गुरुवारी उमेदवारी अर्ज घेतला, मात्र शुक्रवारी (ता.29) सायंकाळी साडे चार वाजता खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरिष बोराळकर यांनी युतीचा धर्म समजावून सांगितला. यामूळे उमेदवारी अर्ज भरणार नाही. पक्ष सांगेल ते काम करणार असल्याचे माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.
शिवसेना-भाजप युती होण्यापुर्वी भाजपतर्फे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून स्वबळाची तयारी केली होती. भाजपकडून माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे उमेदवार असणार होते, मात्र आचारसंहितेपुर्वी शिवसेना-भाजप युती झाली. यामूळे पक्ष सांगेल ती जाबाबदारी स्विकारणार असल्याचे श्री.गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र गुरुवारी (ता.28) अचानकपणे जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने खळबळ उडाली. "कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार अर्ज घेतला होता. शुक्रवारी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, दशरथे हे माझ्या घरी आले. त्यावेळी या नेत्यांसमवेत चर्चा झाली. त्यांनी युतीचे महत्व सांगितले. शिरीष बोराळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणायचे आहे. त्यामूळे युती धर्म पाळावाच लागेल. त्यामूळे पक्ष सांगेल तो आदेश पाळणार आहे. पक्ष सांगेल तेथील सभेत युतीचा प्रचार करणार असल्याचेही श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.